परभणी : संभाजीराजे छत्रपती आमचे सहकारी राहिलेत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आज जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्ह आहे. छत्रपतींनी घोडेबाजाराचे जे कारण दिले आहे ते योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या,खासदार सुप्रिया सुळे यांनी संभाजीराजे ( Sambhaji Raje ) छत्रपती यांच्या निर्णयावर दिली आहे. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) या परभणीमध्ये (Parbhani ) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाध साधला. (Supriya sule Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत माघार घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी घोडेबाजाराचे कारण देत राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या,'संभाजीराजे छत्रपती आमचे सहकारी राहिलेत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आज जो निर्णय घेतलाय तो स्वागतार्ह आहे. छत्रपतींनी घोडेबाजाराचे जे कारण दिले आहे ते योग्यच आहे. संभाजीराजेंना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा'.
परभणीत एका कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं.'आपल्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता, आंबेडकरांचे नाव घेतात आणि श्राप देतात',अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
'गहू निर्याती संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतला होता. परंतु अखेरच्या क्षणी केंद्राने घुमजाव केला. पहाटे सहा वाजता हे सरकार ऑर्डर काढतं. त्यामुळे हे योग्य नाही. सगळ्यांनी निर्यात करता येईल असं सांगायचं आणि आणि ऐन वेळी अशाप्रकारे ऑर्डर काढायची. असं हे सरकार कसा चालत आहे, तेच समजत नाही, असं म्हणत निर्यात बंदीवरून सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.