Latur, Mother
Latur, Mother saam tv
महाराष्ट्र

Latur : दांपत्याचा वाद; लेकराचे भवितव्य टांगणीला, शैक्षणिक दाखल्यासाठी आईचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे

दिपक क्षीरसागर

Latur : पुरोगामी महाराष्ट्रात बालकांना शिक्षणाचा हक्क कायदा असतानाही पती पत्नीच्या वादामुळे मुलीला शाळा सोडल्याचा दाखला मिळत नसल्याने मुलीला चक्क एक वर्ष शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे. शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय मिळत नसल्याने आईने आता थेट मुख्यमंत्र्यांनी टीसी मिळवून द्यावी अशी विनंती केली आहे. (Maharashtra News)

ही अवस्था आहे पुरोगामी महाराष्ट्रातील एका आईची. सासरी मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने माहेरी राहून मुला मुलींचे शिलाई व्यवसाय करत पोट भरणाऱ्या सुप्रिया हीची दुर्दैवी कहाणी. औसा तालुक्यातील भादा गावातील सुप्रिया हीचे २०१५ साली अमोल लुल्ले यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर पती पत्नी यांच्यात वाद झाला.

त्यात सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने परिणामी पती पत्नी यांच्यातील वाद लातुरच्या न्यायालयात सुरू आहे. पती नांदवत नसल्याने सुप्रिया आता आई वडील यांच्याकडे मुलाबाळंसह शिलाई काम करत राहतेय. मुलगी राजेश्वरी हिला औसा येथे शिक्षणासाठी टीसीची आवश्यकता आहे.

पण कण्हेरी लमाण तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापिका पतीच्या सांगण्यामुळे टीसी देत नसल्याने राजेश्वरीला टीसी मिळत नाहीये. राजेश्वरीला गत एक वर्ष शिक्षणापासून घरातच वंचित राहावं लागलं.

टीसी मिळावा यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्याकडे लेखी अर्ज देवुनही तीन महिने झाले. पण न्याय मिळण्याऐवजी उपेक्षा पदरी पडली आहे. आता थेट आईने उदासिन अधिकाऱ्यांना शाप देत मुख्यमंत्र्यांनी टीसी मिळवून द्यावी अशी आर्त हाक दिली आहे.

देशातील पुरोगामी महाराष्ट्रात बालकांना शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू असताना पती पत्नीच्या कलहामुळे मुलीची टीसी न मिळाल्यामुळे एक वर्ष वाया गेले. आणि एका आईला टीसीसाठी वणवण करावी लागत आहे हे दुर्दैव म्हणावं लागेल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hapus Mango : खरा हापूस आंबा कसा ओळखायचा?

Sangola EVM News : मोठी बातमी! सांगोल्यात EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न

Live Breaking News : सलमान खानाच्या घरावर गोळीबार प्रकरण, पाचव्या आरोपीला ठोकल्या बेड्या

Bengal School Jobs Scam: लोकांचा विश्वासच उडेल! शिक्षक भरती घोटाळ्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांची तिखट टिप्पणी

Unseasonal Rain : चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

SCROLL FOR NEXT