Shiv Sena And NCP MLA Disqualification Case  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आमदार अपात्रता प्रकरणावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, आज फैसला होणार?

mla disqualification case maharashtra : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणार आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

प्रमोद जगताप, साम टीव्ही प्रतिनिधी

Maharashtra MLA disqualification case : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचलाय, त्यातच आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णायाविरोधात शरद पवार गटाने कोर्टात धाव घेतली होती, त्याप्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. मागील काही दिवसांपासून ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत होती. आज सुप्रीम कोर्टात या प्रकऱणाची सुनावणी होणार आहे, कोर्ट काय निकाल देणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली नाही. राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या असताना आज कोर्टात सुनावणीची तारीख आलेली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 39 आमदार यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नव्हत त्यामुळं ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती. तर, शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी व्हावी अशी मागणी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती, मात्र कोर्टाने सुनावणी सुप्रीम कोर्टातच होईल अस मागच्या सुनावणीवेळी स्पष्ट केलं होतं.

अजित पवार आणि त्याच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र न केल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल करत या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

10 नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होत असल्याने आज ते याप्रकरणी काही दिशानिर्देश देतात का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! ७० वर्षांच्या महिलेची हत्या, शीर धडावेगळं करत फेकून दिलं

Shiv Sena SC Live : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमका काय युक्तिवाद झाला?

Maharashtra News Live Update: पुण्यात कौन्सिल हॉल चौक ते साधू वासवानी चौक रस्ता २२ ऑगस्टपासून बंद

Dark Knees : गुडघ्यांचा काळपटपणा कमी करायचाय? या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय; ऑफिसमध्ये काम करताना ‘या’ चुका करणं टाळा

SCROLL FOR NEXT