Manikrao Kokate Saam tv
महाराष्ट्र

माणिकराव कोकाटे यांना 'सुप्रीम' दिलासा; कोर्टात शिक्षेला स्थिगिती, नेमकं काय घडलं?

manikrao kokate news : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली आहे.

Vishal Gangurde

माणिकाराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालाय

कोकाटेंच्या २ वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची आमदारकी वाचली

अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाने कायम ठेवलेल्या कोकाटेंच्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची आमदारकी वाचली आहे.

माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी वाचली.

माणिकराव कोकाटे यांना १९ डिसेंबर रोजी हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांची अटक टळली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. हायकोर्टाने शिक्षा कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी जाणार होती. १९ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कोकाटे यांना दिलासा मिळाला होता. परंतु त्यांची आमदारकी जाणार होती.मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार होता. सिन्नरमधून निवडून आलेल्या कोकाटे यांची आमदारकी धोक्यात होती. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने कोकाटे यांना दिलासा मिळालाय.

मानहानी प्रकरणात दोन्ही आमदार अनुपस्थित

विधानसभेत रमी खेळण्याच्या प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात आज सोमवारी नाशिक न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. रोहित पवार यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र रोहित पवार आज न्यायालयात अनुपस्थित होते. तर माणिकराव कोकाटे देखील न्यायालयात अनुपस्थित होते. तसंच खटल्याचे न्यायाधीश देखील रजेवर होते. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Chopra: प्रियांकाने निकला खायला घातला हजमोला; अमेरिकन नवऱ्याचा मजेदार किस्सा सांगितला देसी गर्लने, पाहा व्हायरल VIDEO

Crime: भररस्त्यात रक्तरंजित थरार, गोळ्या झाडून तरुणाची हत्या; जालना हादरले

मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, २ दिवसांत घोषणा होईल; बड्या नेत्याचा दावा|VIDEO

Maharashtra Live News Update: भाजप पाठोपाठ पुण्यात शिवसेनेची आज बैठक

Office Wear Mangalsutra Designs: ऑफिससाठी बेस्ट आहेत 'हे' 5 मंगळसूत्र, तुमच्या वेस्टर्न आणि पारंपारिक लूक शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT