Modi Surname Case Saamtv
महाराष्ट्र

Modi Surname Case: सत्यमेव जयते... सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे सुप्रिया सुळेंकडून स्वागत! नाना पटोले; अशोक चव्हाण काय म्हणाले?

Rahul Gandhi Conviction Stay: काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांच्या गुन्हेगारी बदनामी प्रकरणात शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे राहुल गांधी पुन्हा खासदार होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rahul Gandhi News: मोदी आडनाव प्रकरणात सुरत कोर्टाने (Surat Court) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. याप्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रिम कोर्टाने राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर देशातील तसेच राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

राहुल गांधींना 'सुप्रीम' दिलासा...

याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी यांच्या गुन्हेगारी बदनामी प्रकरणात शिक्षेला स्थगिती दिली आहे. यामुळे राहुल गांधी पुन्हा खासदार होणार आहेत. या निर्णयानंतर देशभरातील कॉंग्रेस नेत्यांनी आनंद व्यक्त केला असून 'यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत हैं', अशी पोस्ट काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.

कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया...

या निर्णयावर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी "सत्यमेव जयते असे म्हणत सत्याचा विजय झाल्याचे म्हणले आहे. सत्याचा प्रेमाचा विजय झाला. पूर्ण देशवासियांना न्याय व्यवस्थेवर भरोसा निर्माण झाला आहे. एका आरोपावर चुकीच्या शिक्षा दिली होती हटली. राहुल गांधीनी प्रेमाचा संदेश दिला होता..." असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

तसेच क्षुल्लक गोष्टीवरुन सदस्यत्व रद्द करणं हा निर्णय लोकशाहीला मारक होता. परंतु कुठेतरी सत्याचा विजय होतोच, ते आज झालं. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही... अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

"हा देश कायद्याने चालणार आहे. राहुल गांधी त्यासाठी लढत आहेत. राहुल गांधी यांच्या संदर्भातील हा निकाल देशाला नव वळण देईल... अशी प्रतिक्रिया नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच दोष नसताना राहुल गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्यात आले; पण राहुल गांधी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही.. असेही ते म्हणाले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे....

दरम्यान, या निर्णयानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी "सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल जी गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुलजी गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे... असे ट्वीट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT