Shiv Sena Political Crisis Saam TV
महाराष्ट्र

Shiv Sena Political Crisis: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच ठरलं; ठाकरे गटाचं पोस्टर VIRAL

Poster Viral: सोशल मीडियावर देखील एक पोस्टर जोरदार व्हायरल करण्यात आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Shiv Sena Case: आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर निकाल लागणार आहे. निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार की ठाकरे गटाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अशात दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकारी निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा करत आहेत. सोशल मीडियावर देखील एक पोस्टर जोरदार व्हायरल करण्यात आले आहे. (Supreme Court Decision on Shiv Sena)

ठाकरे गटाकडून पोस्ट व्हायरल

सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार त्यावरून राज्यात नेमकी कोणाची सत्ता असणार हे ठरणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर एक पोस्टर वायरल केल जात आहे. या पोस्टरमध्ये निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार असं म्हटलं जात आहे.

पोस्टरमध्ये काय लिहिलंय?

"निकाल काहीही असो आम्ही सदैव ठाकरे आणि मातोश्रीसोबत एकनिष्ठ" अशा आशयाचे पोस्टर वायरल केले जात आहे. ठाकरे गटातील अनेक पधादिकारी आणि कार्यकर्ते यांच्या स्टेटस आणि सोशल मीडियावर हे पोस्टर पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. याकाळात काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि शिंदे गटात गेले. मात्र काही आमदार आणि पदाधिकारी असेही होते ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ अद्याप सोडलेली नाही.

या १६ आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिली साथ

१. सुनील प्रभू

२. अजय चौधरी

३. आदित्य ठाकरे

४. कैलास पाटील

५. भास्कर जाधव

६. सुनील राऊत

७. नितीन देशमुख

८.राजन साळवी

९. वैभव नाईक

१०. रमेश कोरगावकर

११. रवींद्र वायकर

१२. संजय पोतनीस

१३. प्रकाश फातर्पेकर

१४. राहुल पाटील

१५. उदयसिंग राजपुत

१६. ऋतुजा रमेश लटके

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, तर या ५ राशींना मिळेल आर्थिक लाभ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणेशोत्सवात पुण्यात ट्रॅफिकचा मोठा बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यासह 'या' मार्गांवर वाहतूक बंद

Maharashtra News Live Update: सांगली भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक खेळणी गौराईचं घरोघरी आगमन..

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT