Supreme Court hearing on Shiv Sena party symbol dispute saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Shiv Sena Supreme Court : सर्वोच्च न्यायालय उद्या शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाशी संबंधित वादावर सुनावणी सुरू ठेवणार आहे. ठाकरे गटाने जोरदार युक्तिवाद केला.

Bharat Jadhav

शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली असून आता उद्या याबाबत सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जबरदस्त युक्तीवाद करत शिंदे गटाची शिवसेना कशी अवैध आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर उद्या पुन्हा पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. गुरुवारी दुपारी २ वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होईल असं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा फैसला उद्याच होणार का अजून त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, ते पाहवे लागेल.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेना पक्षा कोणाची, पक्ष चिन्ह कुणाचं याचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. दरम्यान निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलंय. त्यानंतर ठाकरे गटाने त्याला न्यायालयात आव्हान दिलं. त्यावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलीय.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असून ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर निवडणूक चिन्ह हे मूळ पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाचे? असा प्रश्न यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारला. त्यावर युक्तीवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. पक्षाच्या घटनेनुसार त्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली होती.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे आमदार सूरत आणि गुवाहाटीला गेले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ गटाची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड केली होती, अशी माहिती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला दिली. शिंदे हे फुटीर आमदारांसोबत सूरत, गुवाहाटीला गेले, त्यावेळी ते भाजपच्या संपर्कात होते. एक महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचं शिंदेंनी उघडपणे सांगितलं होतं. ते सातत्याने भाजपच्या संपर्कात होते, त्यांचे हे कृत्य म्हणजे पक्षविरोधी कारवाई होती, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

SCROLL FOR NEXT