SHIV SENA SUPREME COURT HEARING: THACKERAY FACTION’S ALTERNATIVE DEMAND OVER PARTY SYMBOL saam tv
महाराष्ट्र

शिवसेना सुनावणीनंतर राजकीय समीकरण बदलणार? ठाकरे गटाची पक्ष चिन्हाबद्दल पर्यायी मागणी काय?

Shiv Sena Supreme Court Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. पक्ष चिन्हाबाबत पर्यायी मागणी काय करण्यात आली?

Suprim Maskar

  • शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

  • पक्ष चिन्हाबाबत ठाकरे गटाकडून पर्यायी मागणी करण्यात आली.

  • ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता

शिवसेना पक्ष- चिन्हाच्या सुनावणीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत.आता पुन्हा एकदा कपिल सिब्बलांनी शिवसेना ठाकरेंचीच असल्याचा युक्तीवाद मांडताना. पक्ष चिन्हाबद्दल पर्यायी मागणी केलीय. सिब्बल नेमकं काय म्हणाले, पाहूयात या रिपोर्टमधून.

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आणि देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचलीय. ठाकरेसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान मांडलेली एक नवी भूमिका सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलीय.

आत्तापर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह पूर्णपणे उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवे, असा दावा करणाऱ्या सिब्बल यांनी पहिल्यांदाच, थेट धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केलीय. युक्तीवादादरम्यान सिब्बल नेमकं काय म्हणाले ऐका.

शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहावं

शिंदेसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही असा निर्णय द्यावा

शिंदेसेनेने चिन्हाचा वापर करून फायदा घेतला

त्यांच्या बाजूने कोणताही हक्क निर्माण होत नाही

धनुष्यबाण चिन्हाचा बेकायदा वापर केला

चिन्ह आम्हालाही मिळत नसेल, तर ते चिन्ह गोठवा

पक्षाचे शिवसेना नाव हे आमचेच आहे

ज्या गोष्टीचा लाभ घेण्याचा त्यांना मुळात अधिकारच नव्हता

त्यावरून ते कोणत्याही हक्काचा दावा करू शकत नाहीत.

दरम्यान कपिल सिब्बल यांनी आता 'पर्यायी युक्तिवाद' म्हणून चिन्ह गोठवण्याची मागणी केल्यामुळे या प्रकरणाला नवीन किनार मिळालीय. जर न्यायालयाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला, तर येत्या निवडणुकीतील राजकीय समिकरणांवर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT