supply department to provide 4g e pos machines to ration shopkeepers nandurbar saam tv
महाराष्ट्र

4G e-pos machine : नंदुरबार जिल्ह्यात धान्य वाटप गतिमान होणार, 1 हजार 78 ई-पॉस मशिन उपलब्ध; रेशन दुकानदारांमध्ये समाधान

Nandurbar News : नवीन मशीनमध्ये स्क्रीन मोठी असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करताना सोयीस्करही होणार आहे असे मत रेशन दुकानदार व्यक्त करीत आहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar :

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोर जी अँड्रॉइड पॉस मशीन उपलब्ध करून दिले गेले आहेत. सर्व पॉस मशीन जिल्ह्यास प्राप्त झाले असून त्यानुसार धान्य वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 1 हजार 78 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या सर्व दुकानात धान्य वितरणासाठी खासगी कंपनीमार्फत पॉस मशीन देण्यात आले आहे. सद्यस्थितीत सर्व पॉस मशीन थ्री जी सीमकार्ड असलेले असून पाच-सहा वर्षांपासून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी मशीन वापरले. हे पॉस मशीन जुने आणि कमकुवत होत असल्याने दुकानदारांकडून नवीन पॉस मशीन मिळण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने शासनाने जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोर जी अँड्रॉइड पॉस मशीन उपलब्ध करून दिलेले आहेत. सर्व पॉस मशीन जिल्ह्यास प्राप्त झाले व त्यानुसार तात्काळ वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. (Maharashtra News)

या नवीन पॉस मशिन मुळे रेशन वाटपातील तांत्रिक अडचणी दूर होऊन सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. रेशन दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात आलेले नवीन पॉस मशीन फोर-जी असून त्यावर सर्व अँड्रॉइड सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे बॅटरी बॅकअप सहा ते सात तासांचा असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होणाऱ्या गावात या मशीनचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शिवाय नवीन मशीनमध्ये स्क्रीन मोठी असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटप करताना सोयीस्करही होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT