धक्कादायक| पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा वावर  अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

धक्कादायक| पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा वावर

​पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा वावर!

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिकच्या पंचवटी panchavati परिसरात पुन्हा एकदा अघोरी प्रथेचा प्रकार समोर आलाय. पंचवटी परिसरातल्या स्मशानभूमीच्या परिसरातल्या बाभळीच्या झाडाच्या tree खोडावर खिळे, लिंबू आणि काळ्या बाहुल्या ठोकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून वारंवार असे प्रकार घडत असल्यानं स्थानिकांमध्ये local people भीतीचं वातावरण पसरलंय. अमावस्येच्या रात्री हे प्रकार घडत असून प्रत्येक अमावस्येनंतर झाडावरील खिळे, लिंबू आणि काळ्या बाहुल्यांची dolls संख्या वाढत चाललीय. या काळ्या बाहुल्यांची रास पाहून स्थानिकांसह रस्त्याने ये-जा करणारे नागरिकही ये-जा करायला धजावत नाही. In the Panchavati area of ​​Nashik, the type of Aghori practice has come to the fore. Nails, lemons and black dolls are being hammered on tree trunks.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे स्मार्ट सिटी बनू पाहणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून असे अघोरी प्रकार घडत असतांना तसच या प्रकारामुळे झाडांची हानी होत असतानाही काहीही कारवाई होतांना दिसत नाही. तर लोकांच्या असह्ययतेचा फायदा घेऊन असले अघोरी प्रकार करायला सांगून त्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांवर देखील कोणतीही कारवाई होत नसल्यानं असे प्रकार सर्रासपणे घडतांना दिसतं आहेत.

त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे.

शिवाय या झाडावर ठोकण्यात आलेले खिळे, लिंबू आणि काळ्या बाहुल्याही अंनिसकडून काढून फेकण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेची पाळंमुळं अजूनही किती खोलवर रुजलेली आहेत, हे स्पष्ट होत असून अंधश्रद्धेचं हे जोखड दूर सारण्यासाठी सर्वांनीचं प्रयत्न करणं गरजेचं बनंल आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

SCROLL FOR NEXT