MAHENDRA THORVE ALLEGES SUNIL TATKARE saam tv
महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे करत होते उपमुख्यमंत्रिपद अन् अर्थखात्याची जुळवाजुळव, शिंदेसेनेच्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधून उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थखाते मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय खेळीमुळे तटकरे यांचा डाव फसल्याचा दावाही त्यांनी केला.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि सनसनाटी आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी सर्व आमदारांना फोन करून आपल्या बाजूने येण्यासाठी चाचपणी केली होती, असा मोठा गौप्यस्फोट आमदार थोरवेंनी केला आहे. तटकरेंना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखाते हवे होते, मात्र सुनेत्रा पवारांच्या राजकीय खेळीमुळे त्यांचा हा डाव उलटला, असा दावाही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आणि पक्षांतर्गत घडामोडींवरवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल करत राजकीय गौप्यस्फोट केला आहे. तटकरे हे सर्व गोष्टींवरून खोटे बोलत असून ते एक 'कपटी माणूस' असल्याची घणाघाती टीका थोरवेंनी केली आहे.

विलीनीकरणाच्या १३ बैठकांवर मोठे सवाल

अजित पवार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत तब्बल १३ बैठका पार पडल्या होत्या, असा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. जर सुनील तटकरे हे अजितदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते, तर या महत्त्वाच्या बैठकांमध्ये ते का नव्हते? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी आपल्याला आधीच पूर्ण कल्पना दिली होती, असे सांगत तटकरे या विषयावर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप थोरवेंनी केला.

अपघाती मृत्यूवर मौन आणि युटर्न

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे या विषयावर चकार शब्दही काढत नाहीत, अशी टीका करत थोरवे म्हणाले की, सुरुवातीला विलीनीकरणाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही असे सांगणाऱ्या तटकरेंनी आता अचानक यू-टर्न घेतला आहे.

सुनेत्रा पवारांच्या खेळीने डाव उलटला

आमदार महेंद्र थोरवेंनी दावा केला की, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी पक्षातील सर्व आमदारांना वैयक्तिक फोन करण्यास सुरुवात केली होती. सर्व आमदार आपल्याच बाजूने कसे येतील आणि आपल्याला उपमुख्यमंत्री पद तसेच महत्त्वाचे अर्थखाते कसे मिळवता येईल, याची तजवीज तटकरे करत होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी खेळलेल्या राजकीय खेळीमुळे सुनील तटकरे यांचा हा संपूर्ण डाव उधळला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

थंडीच्या दिवसात पेरू भाजून खाण्याचे जबरदस्त फायदे!, चवीसोबत आरोग्यालाही होतील फायदे

Mens Diwali Outfit: दिवाळीला दिसायचंय हँडसम आणि स्टायलिश? पुरुषांसाठी पाहा ७ ट्रेंडी ड्रेसिंग आयडिया!

8th Pay Commission: रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ८व्या वेतन आयोगात पगारासोबत मिळणार ४ मोठे भत्ते?

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

दोन वेळा एका मताने विजय, तिसऱ्या मतमोजणीत मोठा ट्विस्ट; निकालाची राजकीय वर्तुळात चर्चा

SCROLL FOR NEXT