Sunil Tatkare saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीत वार-पलटवार सुरु; सुनील तटकरेंच्या टीकेला भरत गोगावलेंकडून जोरदार प्रत्युत्तर

Raigad News: रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नक्कल केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता गोगावले यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

Omkar Sonawane

रायगड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात राजकीय घमासान आहे. महाविकासआघाडी सरकार काळात देखील पालकमंत्री पदावरून सुरू झालेला संघर्ष हा आताच्या महायुती सरकारमध्ये देखील आहे. पालकमंत्रीपदावरून अजूनही या दोघांमध्ये मोठा वाद आहे. काही दिवसांपूर्वी रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.

या दरम्यान सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली असल्याचे पाहायला मिळाले. खांद्यावर रुमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल करून दाखवली होती. या नक्कलीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल होत आहे.

महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी अजित पवार गटात सुनील तटकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी तटकरे यांनी गोगावलेची नक्कल केली

आता यानंतर भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया देत सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केला. भरतशेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही. नॅपकिन आम्ही वेटर सारखा खांद्यावर घेत नाही, नॅपकिनमध्ये काय आहे, तर गोरगरीबांचे आशिर्वाद आहेत असे सांगताना मी काल परवापासून नॅपकिन वापरत नाही तर अनेक वर्षांपासून वापरतोय. आता मला ती सवय झाली असल्याचे गोगावले म्हणाले.

तुम्हाला सवय करायची असेल तर आम्ही ट्रेनिंग देऊ असा खोचक टोला गोगावले यांनी तटकरे यांना लगावला. तटकरे यांनी केलेल्या नक्कलीचा धागा पकडत, आम्हाला वाटत नव्हत इतके नकलाकार असतील, त्यांचा पाऊस उघडल्यावर एखादा कार्यक्रम लावू असा इशारा देखील गोगावले यांनी तटकरे यांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT