Santosh Potphode joins Shiv Sena in Raigad  Saam TV marathi
महाराष्ट्र

Raigad politics : खासदार सुनील तटकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का; सख्खे व्याही शिंदेंच्या शिवसेनेत

Sunil Tatkare latest news, : रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार अनिकेत तटकरे यांचे सासरे संतोष पोटफोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Santosh Potphode joins Shiv Sena in Raigad : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कुटुंबातूनच राष्ट्रवादीला रायगडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. आमदार अनिकेत तटकरे यांचे सासरे आणि सुनील तटकरे यांचे व्याही संतोष पोटफोडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. पोटफोडे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसनेते प्रवेश केला. हा तटकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.

संतोष पोटफोडे यांनी यापूर्वी रोह्याचे नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे रोहा शहराध्यक्ष अमित उकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील पालकमंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे या वेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे यांचे मामे सासरे आणि रोह्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून अधिकृतपणे शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हा हाय-प्रोफाईल पक्षप्रवेश पार पडला.

संतोष पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा शहराध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक मयूर पायगुडे, युवक शहराध्यक्ष सागर भोबड, पृथ्वीराज पोटफोडे आणि यशराज पोटफोडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला आमदार महेंद्र शेठ दळवी, कोकण विभाग संपर्क प्रमुख भाई खाडे, आणि अनिल नवगणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर रोहा शहरातून झालेल्या या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रोह्यात मोठी राजकीय किंमत मोजावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : सावधान! पुढील २४ तास मुसळधार; विदर्भासह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट 'येलो अलर्ट'

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

बीड शहर हादरलं! न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरात दोन गटात फ्री-स्टाईल हाणामारी|Video Viral

Maratha Reservation:'मसुद्यावर भूमिका स्पष्ट करा, मगच पुढचा निर्णय'; सरकारचा जरांगेंना अल्टिमेटम

Wednesday Horoscope: बुधवार ठरणार खास! या राशींवर होणार पैशांचा वर्षाव, जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT