Sunetra Pawar first woman Deputy Chief Minister of Maharashtra : अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे. आज दुपारी २ वाजता विधीमंडळ गटनेत्याची निवड होईल, या बैठकीसाठी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्यात. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे. (Maharashtra First Women DCM Of Maharashtra)
सुनेत्रा पवार या केंद्रात राज्यसभेच्या खासदार आहेत. सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात सक्रीय होतील, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्यानंतर केंद्रात पार्थ पवार (Parth Pawar likely Rajya Sabha MP) हे खासदार होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांची ही जागा रिक्त होणार आहे, या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी (Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister) कार्यक्रम होणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता ठरणार आहे. या बैठकीसाठी प्रदेक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. राज्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिवमध्ये झाला.
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण आहेत.
१८८५ मध्ये अजित पवार यांच्यासोबत विवाह झाला.
२०२४ मध्ये बारामती लोकसभामधून पराभव झाला. त्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांची निवड झाली.
खासदार सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासह मुंबईत दाखल झाल्या. बारामतीमधून त्या रात्री साडेदहा वाजता निघाल्या होत्या. मुंबईमध्ये आज आमदार खासदारांची दुपारी दोन वाजता बैठक होणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीहून रात्री उशिरा सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी संपन्न झाल्यानंतर काल दिवसभरात बारामतीआणि मुंबईमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. एकीकडे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सुनेत्रा पवार यांच्या भेटीला बारामती मधील सहयोग बंगल्यात येत होते तर दुसरीकडे मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. त्यामुळे अखेर सायंकाळी सर्व निर्णय झाल्यानंतर सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.. सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना होताना त्यांच्यासोबत अजित पवार यांची राजकीय सल्लागार असलेले नरेश अरोरा ही त्यांच्या टीम सोबत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.