Deputy CM Sunetra Pawar interacting with party workers during a meeting. saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: दु:खातून सावरल्या, कामाला लागल्या; सुनेत्रा पवारांच्या पाठबळामुळे कार्यकर्त्यांना धीर

Sunetra Pawar Takes Charge : अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुलवण्यासाठी सुनेत्रा पवारांनी कशापद्धतीनं कामाला सुरुवात केलीय़? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली

  • स्वतःच्या दु:खातून सावरत कार्यकर्त्यांना मानसिक आधार दिला

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या बैठकीत खंबीर भूमिका

ही दृश्य पाहा.दादांच्या मृत्यूनंतर न खचता, न डगमगता कार्यकर्त्यांसाठी धीरोदात्तपणे उभ्या राहिलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. स्वत: दुखातून सावरत सुनेत्रा पवारांनी दादांच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांना धीर दिलाय. निमित्त होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या बैठकीचं. याचं बैठकीत सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांच्या पाठिशी दादांप्रमाणे खंबीरपणे उभं राहणार असल्याचा शब्द दिलाय.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

आपल्यावर संकटाची वेळ आहे, तुम्ही खचून जाऊ नका

तुम्ही आधी जसं काम करत होतात त्याच पद्धतीनं काम करा

मी भक्कमपणे तुमच्या पाठिशी आहे .

अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेत. दादांप्रमाणेच कामाचा सपाटा लावलाय.. पुण्यासह बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत सुनेत्रा पवारांनी जिल्ह्यात सुरु असणारे प्रकल्प दर्जेदार पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

सुनेत्रा पवारांच्या या कार्यपद्धतीमुळे अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? पक्ष विखुरला जाणार का? अशा अनेक चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय...तसचं सुनेत्रा पवारांनी केवळ पद स्वीकारलेलं नाही, तर कार्यकर्त्यांची जबाबदारीही स्वीकारली आहे, असचं म्हणावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT