सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया
शिव–शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्याची पवार यांनी म्हटलं
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'अजितदादांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत आहे. यावेळी ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे', अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाष्य केलं.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झालंय. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिलाय. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारतेय'.
'अजितदादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय. अजित पवारांची कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला .
'राज्यातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा मिळणे माझे सर्वात मोठे बळ आहे. विश्वासाच्या जोरावर, अजितदादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.