Sunetra Pawar assumes charge as National President of NCP following Ajit Pawar’s demise Saam Tv
महाराष्ट्र

अजितदादांचा वारसा कोण चालवणार? राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून मोठी घोषणा

Maharashtra Politics: दादांच्या राष्ट्रवादीत आता सुनेत्रा पर्व सुरु झालंय...सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड कऱण्यात आलीय... मात्र हा प्रस्ताव कुणी मांडला... आणि सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलंय..

Bharat Mohalkar

अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला.. त्यानंतर सुनेत्रा पवारांची आधी उपमुख्यमंत्रिपदी आणि त्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.. आणि आता सुनेत्रा पवारांच्या हाती पक्षाची दोरी देण्यात आलीय... दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक वरळी डोममध्ये झाली... याच बैठकीत प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला....

यानंतर पटेलांनी कार्यकारिणीला आवाहन केलं आणि एकमताने सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.. यानंतर सुनेत्रा पवारांनीही राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहण्याची भूमिका मांडली...

एवढंच नाही तर पार्थ पवारांनाही राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे दादांच्या मृत्यूनंतर सुरु झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय निर्णय घेणार? याबरोबरच आगामी काळात सुनेत्रा पवार राज्यसभा, विधानपरिषद एवढंच नाही तर 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दादांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा घालवण्यासाठी काय रणनीती आखणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय... दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत कुरघोडीवरही मात कऱण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवारांपुढे असणार आहे....हे आव्हान सुनेत्रा पवार कसं पेलणार... यावर दादांच्या राष्ट्रवादीची दिशा ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT