Sunetra Pawar during the NCP press conference that triggered political debate over leadership control. Saam Tv
महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांना बोलू न देताच पत्रकार परिषद आटोपली, सुनेत्रा पवारांना कोण कंट्रोल करतंय?

Sunetra Pawar Control Controversy Ncp Press Conference Row: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पत्रकार परिषदेनंतर सुनेत्रा पवारांना कंट्रोल केलं जात असल्याचे आऱोप केले जात आहेत... मात्र सुनेत्रा पवारांना कोण कंट्रोल करतंय ? आमदार रोहित पवारांनी काय इशारा दिलाय?

Bharat Mohalkar

तुमचं स्टेटमेंट करायचं आणि उठायचं... त्याच्या पलिकडे आम्ही बघू))

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेच्या वेळचा हा व्हिडीओ.... तुम्ही फक्त स्टेटमेंट करा आणि उठा.... त्याच्या पलिकडं आम्ही घेऊ.... अशा सूचनाच दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांना देताना दिसताहेत........ हे कमी होतं की काय... राष्ट्रवादीच्या अधिवेशनात स्टेजवरच्या प्रसंगामुळे दादांच्या कुटुंबाला कंट्रोल कऱण्याच्या चर्चेनं जोर धरला...

मात्र सुनेत्रा पवारांना कमी समजण्याची चूक करु नका, असा इशाराच आमदार रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय.. एका बाजूला सुनेत्रा पवारांना बोलू न दिल्यामुळे त्यांना कोणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतंय का? असा प्रश्न विचारला जातोय.. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेआधी सरोज अहिरेंनी व्यथा मांडून नव्या चर्चेला तोंड फोडलंय.. नेमकं काय म्हणताहेत सरोज अहिरे... तुम्हीच ऐका...

यावर आता दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी रोहित पवार राजकारण करत असल्याचा पलटवार केलाय.. सुनेत्रा पवार या धाराशिवच्या पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत.. त्यामुळे माहेर असो वा सासर त्यांना राजकीय वारसा आहे... त्यातच अजित पवार राज्य सांभाळत असताना सुनेत्रा पवार बारामतीची जबाबदारी सांभाळायच्या... त्यामुळे आता दादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार खरंच पक्षावर कंट्रोल मिळवणार की पक्षाचा कंट्रोल दुसरं कुणाकडे जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT