Supriya Sule’s statement backing Sunetra Pawar fuels fresh speculation over Maharashtra’s Chief Minister race. saam tv
महाराष्ट्र

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना जोर

Sunetra Pawar Cm Supriya Sule Support Ncp Merger Talks: सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पवार कुटुंबातूनच मोठं वक्तव्य कऱण्यात आलंय.. नेमकं काय आहे हे वक्तव्य? रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी त्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत?

Bharat Mohalkar

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरलाय... आणि त्याला कारण ठरलंय पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य... सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आपल्याला आनंदच होईल, असं वक्तव्यच सुळेंनी केलंय.. एवढंच नाही तर सुनेत्रा पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे संकेतही सुळेंनी दिलेत..

खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता...त्यासाठी अजित पवार आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकाही झाल्या.... दोन्ही राष्ट्रवादीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रही लढल्या... मात्र अचानक अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला... त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागलाय..याच मुद्द्यावर रोहित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी दादा असते तर राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं आणि 2029 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री बनले असते, असंही म्हटलंय...

खरं तर सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीसाठी युगेंद्र पवार, रोहित पवारच नाही तर सुप्रिया सुळेंनीही प्रचार केला... सुळेंनी तर महायुतीच्या स्टेजवर जावून सुनेत्रा पवारांना पाठींबा दिला... यानंतर आता सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलंय.. त्यामुळे सुळेंनी पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत दिलेत का? त्यासाठी कौटुंबिक पातळीवर हालचाली सुरु आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Closed : SBI कर्मचाऱ्यांचा संप! सलग ४ दिवस बँका बंद राहणार

Maharashtra News Live Update: दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील यांचे दुःखद निधन

NCP : प्रफुल्ल पटेलांना केलं बाजूला, राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या पवार माय-लेकांकडे

14 Days No Sugar Challenge: १४ दिवस 'साखर' बंद! शरीरात घडतील 'हे' ५ मोठे चमत्कार

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी! इंधन वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं खास पाऊल

SCROLL FOR NEXT