Sunetra Pawar emerges at the center of Maharashtra’s मुख्यमंत्री debate amid Baramati bypoll political developments. saam tv
महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा, निवडणूक बारामतीची, चर्चा मुख्यमंत्रिपदाची

Maharashtra Politics: बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झालीय. सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी नेमकी कुणी केलीय? आणि फडणवीस शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना का पसंती देणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Vinod Patil

राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झालीय. याला निमित्त ठरलंय ते बारामती निवडणुकीतला प्रचार. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बारामतीत प्रचारादरम्यान अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. मात्र महिला आणि बाल कल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी थेट दादांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल असा विश्वास थेट भाषणातूनच व्यक्त केला आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली.

तर राजकारणात अशी परिस्थिती कधीही येऊ शकते आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री आणि नेते छगन भुजबळ यांनी केल्यामुळे या चर्चेला अधिकच धार आलीय.

मुख्यमंत्रिपदाच्या या चर्चेमुळे विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. उद्या फडणवीसांना वारसदार ठरवण्याची वेळ आलीच तर ते एकनाथ शिंदेपेक्षा सुनेत्रा पवारांनाच झुकतं माप देणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. अजितदादांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपवून ठेवली नव्हती. जाहीर भाषणातही ते याबाबत बोलायला मागेपुढे पाहत नसत..दादा गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा थंडावली होती. मात्र बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आता पुन्हा या मुद्यानं उचल खाल्लीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा

Politics: माजी मुख्यमंत्र्यांना मोठा राजकीय धक्का; नीकटवर्तीय निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

चेहरा फुगलेला दिसतोय? चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो कराच

आळंदीत सेवेकऱ्याची कारस्थाने उघड? खात्यात १० लाखांची उलाढाल, मंदिर प्रशासनात खळबळ

Gokul Milk News : बिगुल वाजलं! कोल्हापुरात 'गोकुळ'मध्ये धुरळा; निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT