- सचिन बनसाेडे
MP Sujay Vikhe Patil News : निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत. आम्ही व्याजासह परत करतो असा इशारा भावुक झालेल्या खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वत:ला सावरत गणेश कारखाना निवडणुकीच्या (Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana Election News) सांगता सभेत विराेधकांना दिला. (Maharashtra News)
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील श्री गणेश सहकारी साखर कारखाना (Shree Ganesh Sahakari Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी उद्या (ता. १७ जून) मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर १९ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) विरुद्ध माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) असा सामना पुन्हा एकदा गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला बघायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीत काेण बाजी मारणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे.
दरम्यान गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत भाजपचे खासदार सुजय विखे भावूक झाल्याचं बघायला मिळालं. कारखाना चालवताना कुटुंबाची होणारी ओढाताण आणि मुलगी विचारात असलेल्या प्रश्नाबाबत बोलताना खासदार सुजय विखे यांना अश्रू अनावर झाले. मात्र निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाहीत. आम्ही व्याजासह परत करतो असा इशारा सुजय विखे यांनी विराेधकांना दिला.
सुजय विखे म्हणाले...
गणेशनगर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची नाही.
ही निवडणूक माणूसकीची विश्वासाची आहे.
तुमचा प्रपंच चालावा म्हणून प्रवरा कारखान्याने त्याग केला.
निवडणूकीत पाडण्यासाठी अदृश्य हात असतात. तेच हात आपण निवडून यावे यासाठी काम करताहेत.
त्यांचा नामोल्लेख मी आत्ता करू शकत नाही.
त्यांच्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले...
बाजूच्या लोकांना आपला उत्कर्ष सहन होत नाही.
त्यांच्या मनात द्वेश आणी मत्सराची भावना आहे.
ज्यांचा गणेशनगर कारखान्याशी संबध नाही ते इकडे येऊन भाषण करताहेत.
जेव्हा कारखाना विकायला काढला होता तेव्हा तुमच्या कारखान्याने टेंडर का भरले नाही ?
आम्ही आठ वर्ष कारखाना चालवला आणि कामगारांचे पगारही केले.
तुम्ही कारखाना बंद पाडला मात्र आम्ही चालवला.
ही निवडणूक तुमच्यासाठी फक्त बगलबच्चे वाचवण्यासाठी आहे.
मी गणेशनगर कारखान्याला कर्ज मिळवण्यासाठी स्वतःची प्राॅपर्टी गहाण ठेवली.
थोरात आणि कोल्हेंची दानत आहे का ? ते केवळ लुटायला बसलेत.
गणेशनगर कारखाना खाजगी होवू नये यासाठी फक्त चालवायला घेतला.
आम्ही राजकारणात मोकळेपणाने काम करतो.
आता मात्र तुम्हाला आणि कोपरगावकरांना माफी नाही असा इशारा थाेरात आणि काेल्हेंना विखेंनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.