SUJAY VIKHE BLAMES DONALD TRUMP FOR AHMEDNAGAR-MANMAD HIGHWAY DELAY saam tv
महाराष्ट्र

मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला; भाजप नेत्याचं मिश्किल वक्तव्य

Sujay Vikhe Patil Brain Doctor Politics Damaged My Brain Statement: राहुरीतील तिरंगा रॅलीदरम्यान सुजय विखे पाटील यांनी मिश्किल वक्तव्य करत ‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’ अशी टिप्पणी केली. नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून त्यांनी डांबराच्या तुटवड्याचा मुद्दा मांडत डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धजन्य परिस्थितीला जबाबदार धरले.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

माजी खासदार तथा भाजपचे नेते सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यामुळे चर्चेत राहातात. राहूरी येथे तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी केलेल्या मिश्किल वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला आहे, असं मिश्किल भाष्य त्यांनी केलंय. तर नगर - मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामाला सुजय विखे यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलंय.

मी मेंदूचा डॉक्टर आहे. परंतु राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला, अशी मिश्कील टिप्पणी सुजय विखे पाटील यांनी केली. नगरमध्ये तब्बल 40 हजार कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. मात्र, नगर–मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याच मान्य करताना, युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाल्याचं विखे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा उपाय नाही. रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा असे आवाहन सुजय विखे पाटील यांनी केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही. त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागते. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत, असा सुजय विखे पाटील यांनी केला. नगर-मनमाड महामार्गाच्या कामालाही या परिस्थितीचा फटका बसला असून, नगर-मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या टिकेला विखे यांनी मिश्किल भाषेत प्रत्युत्तर दिल्याच पाहायला मिळाले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत तिरंगा बाईक रॅली; सहपालकमंत्री आशिष जयस्वाल मोटरसायकलवर स्वार

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होणार; १, ०१,००० रुपयांपर्यंत मिळणार लाभ, काय कराव लागेल

Weight Loss Tips: एका महिलेने 'हे' ७ पदार्थ खाणं बंद करुन ४० किलो वजन केले कमी, तुम्हीही रोज खाता का?

IAS तुकाराम मुढेंना राजकारणात यायचंय? FDAच्या आयुक्तांनीच दिलं उत्तर

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT