राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी आज पदभार स्वीकारला आहे. सुजाता सैनिक १९८७ बॅचच्या आयएएस (ISI) अधिकारी आहेत. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला स्वीकारला आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील राज्याचे मुख्य सचिव होते.
राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या शर्यतीत ज्येष्ठतेनुसार १९८७च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, १९८८ च्या तुकडीतील महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि १९८९ च्या तुकडीतील मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. अखेर सुजाता सौनिक यांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.
सुजाता सौनिक या 1987 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या राज्याच्या गृहविभागात अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. अलीकडेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने त्यांना सचिवपदी बढती दिली होती. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागासह अनेक विभागात काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.
सुजाता सौनिक यांनी गेल्या ३ दशकांपासून विविध विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा, राज्य आणि फेडरल स्तरावर शांतता राखणे आणि भारतीय प्रशासकीय सेवा, संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा अनुभव आहे.
सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार राहिले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर सरकारने सुजाता सौनिक यांच्या जागी त्यांचे कनिष्ठ नितीन करीर यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली होती. सुजाता सौनिक जून 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. तोपर्यंत त्या राज्याच्या मुख्य सचिवपदावर राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.