Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : बंडखोरीचा 'बाहुबली' पॅटर्न; पुतण्याचा नांदगावमध्ये बंड, महायुतीच्या उमेदवारानं काकांच्या मतदारसंघातच थोपटले दंड

Maharashtra Political News : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे. नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी बंड पुकारलं. त्यानंतर सुहास कांदेंनी छगन भुजबळ यांचं टेन्शन वाढवलं आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, साम टीव्ही प्रतिनिधी

नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीत नाराज नेत्यांची संख्या वाढू लागली आहे. नाराज नेत्यांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार गटाच्या समीर भुजबळ यांनी पक्षाची साथ सोडून अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. समीर भुजबळ यांच्या घोषणेने सुहास कांदे यांचं टेन्शन वाढलं आहे. त्यानंतर सुहास कांदे यांनी येवल्यात छगन भुजबळ यांच्या विरोधात अपक्ष अर्ज घेतला आहे. त्यामुळे राज्यात बंडखोरीचा 'बाहुबली' पॅटर्न पाहायला मिळत आहे.

नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर नांदगावचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येवला आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळ विरुद्ध कांदे लढत पाहायला मिळणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये शरद पवार गटात मोठी फूट

बीडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बीडच्या आष्टीतून मेहबूब शेख यांना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार गटात मोठी फूट पडली आहे. मेहबूब शेख यांच्या उमेदवारीने निष्ठावंतामध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

तर या मतदारसंघात माजी आमदार साहेबराव दरेकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तिकीट देऊ असा शब्द देऊन देखील तो पाळला नसल्याचा दरेकर यांनी आरोप केला आहे. यामुळे मेहबूब शेख यांच्यावर पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करण्याची वेळ आला आहे.

बीडच्या आष्टी मतदारसंघात शरद पवार गटाने शेख मेहबूब यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह दीडशे पदाधिकाऱ्यांनी आता पक्षालाच सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे साहेबराव दरेकर यांनी म्हटले आहे. मला जयंत पाटील आणि बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत तुमची उमेदवारी फायनल आहे, असा शब्द दिला होता. परंतु मी परत आष्टी येथे येताच पाठीमागे शेख मेहबूब यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता स्वतंत्र लढणार असल्याचं साहेबराव दरेकर यांनी म्हटले आहे.

मेहेकर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी

महायुतीतील शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. मात्र आज भाजपच्या वतीने प्रकाश गवई यांनी अर्ज दाखल केलाय. मी माझ्या उमेदवारीवर ठाम असल्याच गवई यांनी सांगितलं. 29 तारखेपर्यंत एबी फार्म बदलू शकतो. भाजपच्या वरिष्ठांसोबत मागील काळात बोलणं झालं होतं, त्यांनी कामाला लागा अस सांगितले होतं. त्यानुसार मी मेहेकर मतदारसंघात काम करत आहे. मी माझ्या उमेदवारीवर ठाम असून निवडणूक लढविणारच अस स्पष्ट भूमिका गवई त्यांनी आहे. यावरून मेहेकर मतदारसंघात सरळ बंडाखोरी झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT