साखर घोटाळ्याप्रकरणी; वैद्यनाथ बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी गजाआड विनोद जिरे
महाराष्ट्र

साखर घोटाळ्याप्रकरणी; वैद्यनाथ बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी गजाआड

शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

विनोद जिरे

बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे (Vaidyanath Urban co-op Bank) सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, नितीन चितळे यांना उस्मानाबाद आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

उस्मानाबादच्या हावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी मधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती. याच घोटाळाप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याच्या चेअरमन दिलीप यांच्यासह 40 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी यापूर्वी एकास अटक झाली होती आता हे दुसरी अटक करण्यात आलीय

काय आहे प्रकरण ?

हावरगाव शंभू महादेव साखर कारखान्याने 2002 ते 2017 या कालावधीत 46 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 1,14,177 एवढे साखरेचे पोते दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. मुख्य कार्यालय परळी या बँकेस तारण म्हणून साखर साठा ठेवल्याचे दाखवले. तारण असलेल्या साखरेचे गोदाम दि वैद्यनाथ अर्बन को-आप बँक लि. या बँकेने सील केले होते. यात अफरातफर झाली असल्याचे उघडकीस आले होते. यावरून ही कारवाई झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT