SUGAR PRICES MAY HIT RS 100 saam tv
महाराष्ट्र

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

Festival Season Shock: राज्यात साखऱेचे भाव शंभरी पार जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं साखरेची टंचाई होऊ नये म्हणून मोठं पाऊल उचललंय. मात्र, सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण होतोय का?... इथेनॉलच्या वापरामुळेच साखर महागलीये का?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट..

Rohit Kadam

ऐन सणासुदीत साखरेचे भाव गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागतोय. एव्हंढच नाही तर राज्यात साखरेचे दर पुढील काळात शंभरी पार जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात साखरेच्या किंमती जवळपास २५ टक्क्यांपर्यंत वाढल्यात. त्यामुळे राज्यात साखऱेचे दर 80 रुपयांवर पोहोचलेत. तर दुसरीकडे, साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं 10 लाख टन साखर आयात करण्याला नुकतीच परवानगी दिलीये. देशात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा लागू केलीये. त्यामुळे देशात साखरेची नेमकी स्थिती काय आहे पाहूयात...

साखरेची स्थिती

राज्यातील शिल्लक साखर

18 लाख टन

राज्याला दरमहा साखरेची गरज

3 लाख टन

देशातील शिल्लक साखर

54 लाख टन

देशाला दरमहा साखरेची गरज

20 लाख टन

देशात साखरेसंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनेक जणांनी इथेनॉलला जबाबदार धरलंय. इतकंच नव्हे तर इथेनॉलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. भारत हा जगातला साखरेचा दोन नंबरचा निर्यातदार आहे. तरीही भारतावर साखर आयात करण्याची नामुष्की ओढवलीय. आयात केलेली साखर ऑक्टोबरमध्ये देशात येणार असल्याचा अंदाज आहे. त्यात देशातील 30 टक्के ऊस इथेनॉल तयार करण्यासाठी वापरला जातोय. या हंगामात जवळपास 31 लाख टन साखरेइतकं उत्पादन इथेनॉलकडे वळवलं गेल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात साखर शंभरीपार जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘पंचनामे कशाला करता?’ म्हणणाऱ्यांनी वडिलांकडून दुष्काळाचे नियम समजून घ्यावेत; जयकुमार गोरे यांचा प्रणिती शिंदेंना टोला

काँग्रेसच्या नगरसेवकाचा घरात मृतदेह; आमदारांसह नेते-कार्यकर्ते दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

SCROLL FOR NEXT