Solar Village Sadagad-Heti saam tv
महाराष्ट्र

Success Story: सादागड-हेटी गावातील नागरिकांना वीजबिल येतं शुन्य; बनलं राज्यातील पहिले 'सौर ग्राम'

Solar Village Sadagad-Heti : चंद्रपूर जिल्ह्यातील सादागड-हेटी गावातील नागरिकांना एकही रुपये वीजबिल येत नाही. त्यामागील कारण म्हणजे महावितरण कंपनी -जिल्हाधिकारी कार्यालयाने राबवलेला उपक्रम.

Bharat Jadhav

संजय तुमराम, साम प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यामधील सादागड-हेटी गावाची वीजबिलाची समस्या मिटलीय. येथील गावातील ग्रामस्थांना शुन्य वीजबिल येत नाहीये, त्यामागे कारण आहे, महावितरण कंपनी-जिल्हाधिकारी कार्यालयानं राबवलेला उपक्रम. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात सादागड-हेटी गाव आहे. प्रशासनाने या गावात राबवलेल्या उपक्रमामुळे सादागड-हेटी गाव राज्यातील पहिले आदिवासी 'सौर ग्राम' झाले आहे.

या गावात तब्बल २४०० युनिट सौर ऊर्जेची निर्मिती सुरू झालीय. केवळ २० दिवसात सर्व बाधा दूर करून महावितरण कंपनी-जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाने आदिवासी गावात वीजबिल शुन्य केले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सादागड-हेटी पहिले "सौरग्राम" ठरले आहे.

गावात वीज जोडणीसाठी एक शाळा आणि एकूण १९ घरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतील प्रतिकिलोवॅट ३० हजार रूपये अनुदानाचा लाभ घेत गावातील १९ घरांच्या छतावर प्रति एक किलोवॅटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले. त्याचबरोबर शाळेसाठी एक किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प बसवण्यात आलेत. एकूण २० किलोवॅटची सौर यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे महिन्याला सरासरी २४०० युनिटची वीज निर्मिती होणार आहे.

१०० टक्के सौर ग्राम करण्यासाठी महावितरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेमार्फत तातडीने कारवाई करत २० दिवसात सर्व अडचणी दूर करण्यात आल्या. गावातील नागरिकांच्या आर्थिक अडचणी निवारणासाठी बँकानी माघार घेतली. मात्र याच तालुक्यातील द महाराष्ट्र अर्बन को-ऑप, क्रेडिट सोसायटी लिमिटेड या छोट्या संस्थेने धाडसी कर्जरुपी पाठिंबा दिला.

कीर्र जंगलात वसलेल्या या गावातील नागरिकांचे जंगलावर असलेले अवलंबित्व म्हणजे त्यांच्या हंगामी मिळकतीचा पुरावा आहे. वाढलेले वीज दर, वारा-वादळ यामुळे सातत्याने होणारे बिघाड आणि त्याचा दैनंदिन आणि शैक्षणिक कामांवर होणारा परिणाम, त्यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी सौर प्रकल्पाला होकार दिला. त्याचा गावकऱ्यांना फायदा होतोय. यामुळे ग्रामस्थ आनंदीत झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT