छत्रपती संभाजीनगरमध्ये केली केशरची शेती
दहा बाय दहाच्या खोलीत फुलवलं केशर
सीए प्रिया अग्रवाल यांचा यशस्वी प्रयोग
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाने केशरची शेती केली आहे. दहा बाय दहाच्या खोलीत केशर बहरले आहे. मराठवाड्यासारख्या कोरड्या आणि उष्ण हवामानाच्या प्रदेशात चक्क केशरचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. संभाजी नगरमधील सीए प्रिया अग्रवाल यांनी हा प्रयोग केला आहे.
एअरोपॉनिक्स तंत्राने वातावरण नियंत्रित करून घरातच छोट्याशा खोलीत हा प्रयोग केला होता. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ३५ ग्रॅम उत्पादन घेतले. यासाठी त्यांना जवळपास ८ लाख रुपये खर्च आला.
केशर काढण्याची पद्धत (Kesar Cultivation)
केशरच्या नाजूक काड्यांइतकेच ते उगवणे आणि कापणीची खास पद्धत असल्याने एक ग्रॅम केशरची किंमत किमान ६०० रुपयांच्या पुढे आहे. अव्वल दर्जाच्या केशरसाठी जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर प्रसिद्ध आहे. परंतु भारतात केशरचे उत्पादन मर्यादित झाल्याने ते आयात करावे लागते.
प्रिया यांनी काश्मीरला भेट दिली होती. त्यांनी शेतकऱ्यांकडून केशरची शेती समजून घेतली. नंतर काश्मीरमधूनच वेगवेगळ्या आकाराचे केशरकंद, बिया मागवल्या. महाराष्ट्रात मुख्य आव्हान तापमानाचे होते. यासाठी त्यांनी आपल्या घरातीलच दहा बाय दहाच्या जागेत एरोपोनिक्स तंत्रज्ञानाने नियंत्रित वातावरण तयार केले. यामुळे अगदी काश्मीरचे सकाळ, दुपार, सायंकाळ व रात्रीचे तापमान यानुसार केशरकंदांना मिळाले.
घरातच तयार केले केशरसाठी पोषक वातावरण
घरातच त्यांनी लाइटची व्यवस्था केली. एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये नॅनो कणांमधील सूक्ष्म पोषणद्रव्यांचा वापर केला जातो. यामुळे वनस्पतींना नॅनो पोषक द्रव्ये अधिक कार्यक्षमतेने शोषून घेता येतात. यासाठी जवळपास आठ लाख रुपये खर्च आला. पाम्पोर येथील माती पाणी धरून ठेवत नाही. या मातीचे गुणधर्म असलेली माती प्रिया यांनी तयार करून घेतली. ट्रेमध्ये केशरची लागवड केली. ऑक्टोबरपासूनच केशरची जांभळ्या रंगाची फुले बहरली. सध्या या फुलांमधून केशर काढण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.