बीडमध्ये १०४ बालविवाह रोखण्यात यश! File Photo
महाराष्ट्र

बीडमध्ये १०४ बालविवाह रोखण्यात यश!

बीडमधील 'बेटी बचाव बेटी पढाव' या सामाजिक संघटनेच्या सदस्यांसह प्रशासनाची कारवाई

विनोद जिरे

बीड : बालविवाह विवाह लावणे कायद्याने जरी गुन्हा असला तरी, हा गुन्हा ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिक बिनबोभाटपणे करत आहेत. यामध्ये अज्ञानी लोकांसह सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या नागरिकांचा देखील सहभाग असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. गेल्या 7 महिन्यात बीड जिल्ह्यात तब्बल 104 बालविवाह रोखण्यात "बेटी बचाव बेटी पढाव" या सामाजिक संघटनेच्या सदस्यांसह प्रशासनाला यश आले आहे.

हे देखील पहा -

बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. याठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करतात. हे स्थलांतर करत असताना, घरातील मुलीच्या सुरक्षिततेचा विचार करून अनेक पालक मुलीचे बालवयातच लग्न लावून देतात.

बीड जिल्ह्यात याच वर्षी जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांमध्ये 104 मुलींचे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यामध्ये 11 वर्ष ते 17 वर्ष वयाच्या मुलींचा समावेश आहे. अशी माहिती "बेटी बचाव बेटी पढाव" चे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाचा टोकाचा निर्णय; गळफास घेत दोघांनी आयुष्य संपवलं

Tea Addiction: दुधाचा चहा पिताय? सावधान! शरीरावर होईल गंभीर परिणाम

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा

Leopard Attack : बिबट्यानं आधी हल्ला केला, मग फरफटत नेलं, वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनं हळहळ

SCROLL FOR NEXT