narendra modi, ravan, Subramanian Swamy, Pandharpur Corridor  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News : 'नरेंद्र मोदी म्हणजे रावण, फडणवीसांच्या मदतीने रचलं जातेय माेठं षडयंत्र'

वारकरी संप्रदाय व स्थानिकांशी करणार चर्चा.

भारत नागणे

Pandharpur Corridor : पंढरपूर विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पंढरपुरात उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचे निश्चित केले आहे. मात्र या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसर व प्रदक्षिणामार्गाच्या आतील सुमारे पाचशेहून अधिकची घरे भूसंपादित होण्याची शक्यता असल्याने पंढरपूर कॉरिडोरला (Pandharpur Corridor Marathi News) विराेध हाेऊ लागला आहे. विराट हिंदुस्थानचे अध्यक्ष डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील यास कडाडून विरोध केला आहे. (Maharashtra News)

माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी याबाबत ट्विट (tweet) करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे रावण असल्याचे म्हटले आहे. काशी वाराणसी उध्वस्त केल्यानंतर पंढरपूर उध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आराेप स्वामी यांनी केला आहे.

पंढरपूरातील स्थानिक धार्मिक स्थळे, पुरातन वास्तू मंदिर उध्वस्त करून कॉरिडोर करायला डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी विरोध दर्शविला आहे. राज्य सरकारला कॉरिडोर न करण्याची मागणी करण्यात येईल. त्यांनी न ऐकल्यास न्यायालयात कॉरिडोर विरोधात याचिका दाखल करु असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT