mla rajkumar patel, melghat, amravati saam tv
महाराष्ट्र

Amravati News : शाळा आम्हांला पाेटभर जेवण देत नाही, मागितले तर शिक्षक मारतात; आमदारांपुढे मुली ढसाढसा रडल्या

सध्या या विद्यार्थ्यांना धारणी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावतीच्या मेळघाट मधील आदिवासी मुलींना प्रकल्प कार्यालयामार्फत वाशिम जिल्ह्यातील देवगाव फाटा रिसोड येथील नामांकित शाळेत प्रवेश दिला. मात्र मुलींना स्थानिक शाळा प्रशासनाने मारहाण करीत शाळेतून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Maharashtra News)

या शाळेत आठवी ते दहावीच्या वर्गात मुली शिक्षण घेत होत्या. त्यांना नियमित जेवण मिळत नसल्याने त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. मात्र भाजी ऐवजी त्यांना चटणी खा अशी तंबी देत त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यांनी चटणी खाण्यास विरोध केला.

यावेळी शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना मारहाण करीत पुन्हा आपल्या घरी पाठवल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्यासमोर त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगितला. तसेच समस्येवर उपाय काढावा अशी मागणी केली.

या विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार राजकुमार पटेल यांनी घटनेची चाैकशी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. सध्या या विद्यार्थ्यांना धारणी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT