Chhatrapati Sambhajinagar Saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar: विद्यार्थ्यांचा थर्माकोलवरून शाळेपर्यंत जीवघेणा प्रवास; छत्रपती संभाजीनगरकरांचे हाल केव्हा संपणार?

Vishal Gangurde

Chhatrapati Sambhajinagar Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना थर्माकोलवरून शाळेपर्यंत जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांचं भीषण वास्तव समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या भिव धानोरा गावातील हा धक्कादायक प्रकार आहे. (Latest Marathi News)

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, छत्रपती संभाजीनगरच्या भिव धानोरा गावातील प्राजक्ता आणि तिच्या १५ शाळकरी मित्र-मैत्रिणींना रोज जायकवाडी धरणाचा बॅकवॉटर ओलांडून शाळा गाठावी लागते. प्राजक्ताच्या मित्र-मैत्रिणींना रोज शाळेत जाण्यासाठी थर्माकोलचा वापर करावा लागतो. तसेच शाळेत थर्माकोलवरून जाताना त्यांना पाण्यातील सापांचाही सामना करावा लागत असल्याचेही समोर आले आहे.

थर्माकोलवरून शाळेपर्यंत धरणाच्या बॅकवॉटरमधून जीवघेणा प्रवास करणारी प्राजक्ता म्हणाली, 'आम्ही शाळेत जात असताना थर्माकोलवर चढणाऱ्या पाण्यातील सापांना रोखण्यासाठी आम्ही बांबूच्या काठ्या घेऊन जातो'.

तत्पूर्वी, जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे एकाच गावाचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जायकवाडी धरणाचा बॅकवॉटर पार करावा लागतो. गेल्या ४७ वर्षांपासून परिस्थिती तशीच असल्याचेही वास्तव समोर आलंय. इतके वर्ष उलटले तरी या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याचेही समोर आले आहे.

थर्माकोलवरून प्रवास करणाऱ्या प्राजक्ताच्या वडिलांचं म्हणणं आहे की, 'माझ्या मुलांनी माझ्यासारखं अडाणी राहू नये. यासाठी माझी मुलगी थर्माकोलवरून शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करते. पाण्यात विषारी साप असल्याने मला भीतीही वाटते'.

मुख्याधापक राजेंद्र खेमनार यांनी थर्माकोलवरून शाळेपर्यंत जीवघेणा प्रवासाची दखल घेतली. खेमनार म्हणाले,'मी काही महिन्यांपूर्वी या शाळेत काम करण्यास सुरुवात केली. शाळेतील शिक्षकांकडून ऐकले आहे की, अनेक वर्षांपासून हवामानाची परवा न करता मुले नियमितपणे शाळेत येत आहेत'.

दरम्यान, या गावातील नागरिकांना धरणाचा बॅकवॉटर पार करण्यासाठी एखादा पूल हवा आहे. या गावच्या सरपंच सविता चव्हाण म्हणाल्या की, 'गावातील हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे मांडण्यात आला आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत'.

तहसीलदार सतीश सोनी यांनी परिसराला भेट देऊन अहवाल तयार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'जायकवाडी धरणाच्या बांधकामाच्या वेळी संपूर्ण गावाचे पुनवर्सन करण्यात आलं होतं. सात ते आठ कुटुंबांना त्यांच्या शेतात राहायचं होतं. त्यामुळे या भागात राहणाऱ्या मुलांना दररोज धरणाच्या बॅकवॉटरमधून शाळेत जाण्यासाठी प्रवास करावा लागतो'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT