Bhandara Accident News अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू; मृतदेहाचा शोध अद्यापही सुरुच

Bhandara Accident News : आदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चाना शेत शिवाराच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता.

अभिजीत घोरमारे

भंडारा: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drowned In Water) झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara) लाखनी तालुक्यातील चाना येथे घडली आहे. आदित्य विजय वाघाये ( 17 ) रा. केसलवाडा - वाघ असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव असून तो स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी होता. (Bhandara Latest News)

आदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी चाना शेत शिवाराच्या नाल्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेला होता. नाल्याच्या पाळीवर कपडे आणि चपला काढून तो पाण्यात पोहण्यासाठी शिरला. मात्र बंधाऱ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही बाब त्याच्यासोबत असलेल्या मित्राला लक्षात येताच त्याने मोबाईलद्वारे ही माहिती आदित्यच्या कुटुंबियांना दिली.

कुटुंबियांनी ही माहिती लाखनी पोलिस स्टेशनला दिली. यानंतर केसलवाडा-वाघ येथील पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने त्याच्या आदित्यचा शोध घेण्यात आला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात बाधा निर्माण होत आहे, त्यामुळे अद्यापही आदित्यचा शोध सुरुच आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT