Buldhana Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: देऊळगाव मही येथील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

धनंजय देऊळगाव मही येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात 12 व्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील देऊळगाव मही ग्रामपंचायतीत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करत होते. काल दुपारी वाकी रस्त्यावरील त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला धनंजयने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा - बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेतातील (Farmer) निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना देऊळगांवराजा (Deulgaon Raja) तालुक्यातील देऊळगाव मही येथे घडली आहे. 18 वर्षीय धनंजय समाधान खिल्लारे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हे देखील पहा -

धनंजय देऊळगाव मही येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात 12 व्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील देऊळगाव मही ग्रामपंचायतीत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करत होते. काल दुपारी वाकी रस्त्यावरील त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला धनंजयने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेतात काम करणाऱ्या त्याच्या भावाच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ देऊळगावमही पोलीस चौकीला कळविण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक आकील काजी, किशोर साळवे, रुपेश जोरवाल यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्याप पर्यंत समजले नाही. या प्रकरणी पुढील पोलीस तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

Maharashtra Live News Update : पुणे महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

SCROLL FOR NEXT