Buldhana News  Saam Tv
महाराष्ट्र

Student Flag Hoisting News : शाळेत पोहोचणं अशक्य झालं, विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच केलं ध्वजारोहण; नेमकं काय झालं?

Independence Day 2023 : बुलडाणा तालुक्यातील पलढग येथील विद्यार्थी तरोडा येथे समता हायस्कूलमध्ये जात होते.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News :  स्वातत्र्यंदिनानिमित्त ध्वजारोहणासाठी निघालेली शाळेतील मुलांची गाडी रस्त्यातच बंद पडली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ध्वजारोहण केलं. बुलडाणा तालुक्यातील पलढग येथील विद्यार्थी तरोडा येथे समता हायस्कूलमध्ये जात होते.

मात्र शाळेत जात असताना त्यांची स्कूल बस रस्त्याच्या बाजूला घसरली. चिखलात रुतलेली स्कूल बस काढायला बराच वेळ लागला. ध्वजारोहणाला शाळेत जाणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांनी रस्त्यातच ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि राष्ट्रगीतही घेतले.  (Latest Marathi News)

सांगलीत स्कूल बसला अपघात

सांगलीच्या कवठेमहांकाळ रत्नागिरी-नागपूर महामार्ग लांडगेवाडी वस्ती येथे आनंद सागर स्कूलच्या गाडीचा अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली. गाडीमध्ये 14 विध्यार्थी होते.

अपघातात 5 मुली जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तर ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: स्थानिक आमदारामुळे ८०३ कुटुंबियांच्या घरांचं स्वप्न भंगलं; म्हाडाचा अनागोंदी कारभार

Maharashtra Live News Update: अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाले

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Pune Tourism : कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी पुण्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथून दिसतो निसर्गाचा अद्भुत नजारा

SCROLL FOR NEXT