Pune News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News: अभ्यास करत नाही म्हणून वडील ओरडले; मुलाने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं

संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : अभ्यास करत नाही म्हणून पालकांचं रागावणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र वडील रागवल्याचा राग धरून अकरावीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील ही घटना घडली आहे. (Latest News)

शार्दुल कोपळकर असं गळफास घेतलेल्या मुलाचं नाव आहे. शार्दुलने आत्महत्येपूर्वी एक सुसाईन नोटही लिहिली आहे. 'सॉरी आई बाबा मला माफ करा, आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही' असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहून त्याने गळफास घेतला. स्वानंदनगर भागात हा मुलगा रहात होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Crime News)

जवाहर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्दुल शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात अकरावी कॉमर्सच्या वर्गात शिकत होता. काही दिवसांपासून त्याचं अभ्यासात लक्ष नव्हते. त्यामुळे त्याला वडील रागावले. याचा राग मनात ठेऊन त्याने टोकाचं पाऊल उचललं.

कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शेजारच्या मदतीने त्याला काटे रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये त्याने 'सॉरी आई बाबा मला माफ करा' असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By - Pravin Wakchoure

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये पाणी चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल,300 जणांना नोटिसा!

शेतकरी कर्जमाफीमध्ये मोठी अपडेट! OTS अंतर्गत पहिली यादी जाहीर; 1.69 लाख शेतकऱ्यांना संधी, यादीत तुमचं नाव आहे का?

नागपूरचं नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची मागणी; काँग्रेसचा पाठिंबा, भाजपची सावध भूमिका

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! चार अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, कोणाची कुठे झाली बदली?

'या' महिन्यात होणार मोठा राजकीय भूकंप? शिवसेना कुणाची, खासदाराने थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT