Solapur: राज्यपालांच्या सोलापुरात दौऱ्यात जोरदार निदर्शने; वक्तव्याविरोधात आंदोलन Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: राज्यपालांच्या सोलापुरात दौऱ्यात जोरदार निदर्शने; वक्तव्याविरोधात आंदोलन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले

भारत नागणे

सोलापूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राज्यपाल (Governor) परत एकदा वादामध्ये सापडले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. (Strong protests during Solapur Governor visit)

या पार्श्वभूमीवर विमानतळ(Airport), आसरा चौक, विवेकानंद केंद्र या भागामध्ये पोलीस (Police) छावणीचे स्वरूप आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने शिवप्रेमींनी राज्यपालांच्या निषेधाची भूमिका घेतली आहे. या दरम्यान निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासून शिवप्रेमी मोठ्या संख्येने राज्यपाल जाणार असलेल्या आसरा चौकामध्ये जमा झाले होते.

हे देखील पहा-

भगवे झेंडे घेतलेले हे आक्रमक आंदोलकांना पोलीस प्रशासनाने आसरा चौकामध्ये अडवून ठेवले आहे. याकरिता मोठा फौजफाटा तैनात केला असून ड्रोन द्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. राज्यपालांचा पहिला कार्यक्रम विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापुरात शिवप्रेमींना रोखण्यासाठी काही मार्ग वाहतुकीस बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना माणसांना त्रास सोसावा लागत आहे. विमानतळाबाहेर १५ ते २० हजार शिवप्रेमी जमणार असल्याचा दावा शिवप्रेमींनी केला जात आहे. यावेळी ग्रामीण भागात देखील रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास १५०० हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त सोलापूर शहरामध्ये लावण्यात आला आहे. यामध्ये ३ पोलिस उपायुक्त, ९ सहाय्यक पोलिस आयुक्त, २६ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक पोलिस निरीक्षक, एक हजार ६२ पोलिस कर्मचारी, ४०० होमगार्ड, २ राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT