पालघर: पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या पोट निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये काही ठिकाणी बहुरंगी लढती पहावयास मिळत आहे. तर बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप व राष्ट्रवादी अशा लढती रंगत आहेत. (Strong front formation in Palghar Zilla Parishad election)
हे देखील पहा -
ग्रामीण भागांमध्ये माकप, भाजप, बहुजन विकास आघाडी व शिवसेना यांच्यात चुरस असल्याचे दिसून येते. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपलेसे करण्यासाठी आश्वासनांचा डोंगर उभा करीत आहे, तर शिवसेना भाजप व काँग्रेस या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षांचे पक्षश्रेष्ठी यांची जिल्ह्यात वर्णी लागल्याचे दिसून आले. वाड्यामध्ये शिवसेना खंबीर असली तरी तेथे भाजप व मनसे या दोघांनी युती केल्यामुळे शिवसेनेला येथे फटका बसेल असे सांगितले जात आहे, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये वनराई जिल्हा परिषद गट चर्चेत आला आहे. या गटामध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या सुपुत्राला रोहित गावित यांना शिवसेनेकडून तिकीट मिळाल्यामुळे या गटामध्ये निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. खासदार असल्यामुळे त्यांच्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असून ही लढाई त्यांनी प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते.
असे असले तरी शिवसेनेच्या काही अंतर्गत वादामुळे रोहित यांची मते इतर ठिकाणी वळवली जाताना दिसत आहेत, तर या गटामध्ये भाजप व राष्ट्रवादी यांचाही मतदारांवर चांगला पगडा असल्यामुळे त्याठिकाणी मते विभागली जाणार आहेत. त्यामुळे या गटांमध्ये काही मतांच्या फरकाने उमेदवार निवडून येण्याची चिन्हे आहेत. यासाठी सर्वांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून येते. कासा गटांमध्येही शिवसेना विरुद्ध भाजपा व माकप अशी लढत रंगणार आहे असे असले तरी या भागांमध्ये शिवसेना - भाजपाला मोठे आव्हान आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.