या जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांची मोठी घोषणा Saam Tv
महाराष्ट्र

या जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांची मोठी घोषणा

राज्यामध्ये कोरोनाची (Corona) परिस्थितीमध्ये नियंत्रणामध्ये असल्याचे चित्र असले तरी परत एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: राज्यामध्ये कोरोनाची (Corona) परिस्थितीमध्ये नियंत्रणामध्ये असल्याचे चित्र असले तरी परत एकदा कोरोनाच्या चौथ्या लाटेची (Corona) भीती वर्तवली जात आहे. कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या विषाणूचा संसर्गाचा वेग जास्त असल्याने रुग्णसंख्या परत झपाट्याने वाढू शकते. कोरोनाला मुळासकट नष्ट करायचे असेल तर आपल्याला रोगप्रतिकार क्षमता वाढवावी लागणार आहे. त्याकरिता कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य आहे.

विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये (Omicron) परत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या (Aurangabad) जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा (Vaccination) टप्पा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात परत कडक निर्बंध (Restrictions) लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर संबंधित व्यक्तीला उद्यापासून पेट्रोल- डिझेल मिळणार नाही.

हे देखील पहा-

तसेच गॅस, सीएनजीसुद्धा मिळणार नाही. संबंधित व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय त्यांना इंधन मिळणार नाही. याशिवाय विजेची समस्या असणार आहे, तरी दोन्ही लस घेतल्याशिवाय सोडवली जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी परत एकदा निर्बंध लागू करत असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने ते जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा नंबर लागला नाही. कारण औरंगाबादची लसीकरणाची टक्केवारी कमी आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७४ टक्के नागरिकांनी १ डोस घेतलेला आहे. २६ टक्के नागरिकांचे अद्याप लसीकरण झाले नाही. तर २ लस घेतलेल्या नागरिकांची संख्या फक्त ५४ टक्के आहे. यामुळे जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पेट्रोल पंपावर लसीकरणाचे प्रमाणपंत्र तपासण्याकरिता जिल्हा प्रशासनात कर्मचारी किंवा पोलीस असनार आहेत. ते कुणाचे लसीकरण झाले की नाही याची शहानिशा करतील. कारण पेट्रोलपंपावर लसीकरणाचे प्रमाणपत्र कुणी तपासावे \यावरुन गेल्यावेळेस गोंधळ झाल्याचे बघायला मिळाला होता.

मात्र, आता सरकारी कर्मचारीच पेट्रोल पंपावर लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासण्यासाठी असणार आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस याविषयी सतर्कता पाळणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडासा वचक असणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोल पंपावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT