stray dogs bite 17 citizens along with kids in dhakni near yavatmal  Saam Digital
महाराष्ट्र

Yavatmal : ढाणकीत भटक्या कुत्र्यांची दहशत,17 जणांचा घेतला चावा

stray dogs bite 17 citizens along with kids in dhakni near yavatmal: रुग्णालयात अत्यावश्यक अशी रेबीजची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

यवतमाळच्या ढाणकी येथे 17 नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून चावा घेतला. यामुळे ढाणकीत कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे. दरम्यान नगरपंचायत प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

यवतमाळच्या ढाणकी शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास नेहमीचाच झाला आहे. मुख्य बाजारपेठेतील मधील रस्ता तसेच बस स्टॉप वर दहा-बारा मोकाट कुत्र्यांचे टोळके नेहमीच बसत असल्याने ये - जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी याआधी नागरिकांनी नगरपंचायतकडे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने या घटना घडल्या कुत्र्याने हल्ला केलेल्या जखमी नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान रुग्णालयात अँटि लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले तसेच उमरखेड जाण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गणपती विसर्जनाला रेकॉर्ड, ३१ तासांपासून मिरवणूक सुरूच

Online Food Delivery : ऐन सणासुदीच्या हंगामात महागाईची फोडणी; ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महागणार?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : भरतीच्या अडथळ्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब|VIDEO

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार जपून करावे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

KDMC च्या प्रसुतीगृहात १ दिवसाच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT