Amravati News अरुण जोशी
महाराष्ट्र

झेंडा काढण्याच्या कारणावरून अचलपुरात दगडफेक, संचारबंदी लागू

अतिरिक्‍त पोलीस बलासह पोलीस अधीक्षक शहरात दाखल

अरुण जोशी

अमरावती - जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून परिचित असलेल्या अचलपूर (Achalpur) येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास झेंडा काढण्यातचा झालेला वाद विकोपाला गेल्याने दगडफेक झाल्याने शहरात संचारबंदी (Curfew) लावण्यात आली आहे. अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभ प्रमाणे विविध धर्माचे झेंडे लागतात.

हे देखील पहा -

मात्र रात्री बाराच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढलाने वाद निर्माण झाला. काही काळात वादाचे रूपांतर दगडफेकमध्ये झाले. मध्यरात्री शहर झालेला हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच एसआरपी व स्थानिक पोलिसांनी मिळून हा वाद नियंत्रणात आणला.

याबाबत अधिक माहिती देताना अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गरुड म्हणाले की, अचलपुरात दोन गटात झालेला वाद विकोपाला जाण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात रात्रीपासून जमाबंदी सुरू करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

Vijay Deverakonda : "डोके दुखतंय..."; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT