Crime News
Crime News Saam Tv
महाराष्ट्र

फेसबुक कमेंटवरून राडा; पोलिसांवरही हल्ला; १५० जणांवर गुन्हा

साम टिव्ही ब्युरो

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : शहरातील विजय चौक परिसरात दोन गटात झालेल्या दगडफेक व पोलिसांवरील हल्ल्या प्रकरणी १५० नागरिकांवर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाल्याची माहिती पाेलिस ठाण्यातून देण्यात आली. दरम्यान दंगा करणा-याविराेधात खूनाचा प्रयत्न करणे (कलम ३०७ सह) अन्य १० वेगवेगळ्या कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी काही युवक आल्यानंतर या प्रकाचाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी काही पाेलिस कर्मचारी गेल्यानंतर त्या घटनास्थळी त्यांच्यावर २५ ते ३० जणांच्या जमावाने विटा, दगड, फरशी फेकून हल्ला केला.

पोलिस कर्मचारी सायलू बिरमवार यांच्या फिर्यादीनूसार खूनाचा प्रयत्न करणेसह विविध कलमानुसार तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिस निरीक्षक सुरेश बुधवण यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

J P Nadda : भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो; RSSच्या प्रश्नावर जे.पी.नड्डा यांचं वक्तव्य

Sonalee Kulkarni : पत्रकार ते अभिनेत्री; सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

Gurucharan Sinh News | तारक मेहता फेम अभिनेते गुरुचरण सिंह परतले

Health Tips Water : तहान नसतानाही पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक

Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

SCROLL FOR NEXT