Stone Pelting on Minister Atul Save’s Saam Tv
महाराष्ट्र

Atul Save: मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक, संभाजीनगरमधील भयंकर घटना; VIDEO व्हायरल

Stone Pelting on Minister Atul Save: मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. संभाजीनगरच्या पुंडलिकनगरमध्ये ही घटना घडली. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे.

  • पुंडलिकनगर कार्यालयाबाहेर त्याच्या कारवर दगडफेक करण्यात आली.

  • दगडफेकीमध्ये कारचे मोठे नुकसान झाले.

    आरोपी मनोरुग्ण असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संभाजीनगरच्या पुंडलिक नगरातील ऑफिसबाहेर दगडफेक करण्यात आली. मंत्री अतुल सावे यांच्या ऑफिसबाहेर उभ्या असलेल्या कारवर एकाने दगड मारला. दगडफेकीमुळे अतुल सावे यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दगडफेक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री अतुल सावे यांच्या कारवर संभाजीनगरमध्ये दगडफेक करण्यात आली. अतुल सावे पुंडलिकनगर येथील कार्यालयात बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांची कार उभी होती. या कारवर एकाने दगडफेक केली. दहडफेक करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर संभाजीनगरमधील एका ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. गणेश सखाराम शेजुळ असं आरोपी व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती मूळची जालना जिल्ह्यातील असून सध्या संभाजीनगरमधील हनुमाननगरमध्ये राहते. त्याने मंत्र्यांच्या कारच्या काचेवर मोठा दगड मारला. त्यामुळे गाडीची काच फुटली. या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu : गुलाबराव पाटलांच गुलाबाऐवजी कमळावर जास्त प्रेम; बच्चू कडूंचा मिश्किल हल्लाबोल

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवल्या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धाराशिव साबळेवाडी पाझर तलाव फुटला, शेतकऱ्यांचा मोठा फटका|VIDEO

Aishwarya Narkar Dance: 5 लाख फॉलोअर्स पूर्ण, ऐश्वर्या नारकर यांचा आनंद गगनात मावेना, सुंदरी गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

मराठीचा आग्रह असणाऱ्या मनसे नेत्याच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी; भाजपकडून ट्रोल | VIDEO

SCROLL FOR NEXT