कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात, शेवट 'या' आठवड्यात होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांची माहिती Saam TV
महाराष्ट्र

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात, शेवट 'या' आठवड्यात होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांची माहिती

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा (School) बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे.असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.आज राजेश टोपे (Rajesh Tope) हे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा (School) बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे.असं आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील अस म्हटलं आहे.

राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम (Corona) आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांत वाढ झाल्यानेच निर्बंध लावले असून लोकांची काळजी घेणे गरजेचं आहे. 'जान है तो जहान है' असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणंही महत्वाचं ,आहे असं टोपे यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या टिकेला उत्तरं देत म्हटलं आहे.

हे देखील पहा -

आज मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती,सद्य उपलब्ध असलेली साधन सामुग्री याबाबत चर्चा झाली असून ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली असून आता निधी खर्च करण्याला वेग येईल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले. बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्याचं टोपे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

Chinchpoklicha Raja: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा जल्लोषात; गणेशभक्तांची मोठी गर्दी; पाहा बाप्पाची पहिली झलक

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Julali Gaath Ga: सावी घरच्यांचा विरोध पत्करून करणार धैर्यसोबत लग्न; 'जुळली गाठ गं' मालिकेत अखेर सावी-धैर्यची जुळली सात जन्माची गाठ

SCROLL FOR NEXT