coronavirus
coronavirus  
महाराष्ट्र

काेराेना थाेपविण्यासाठी साता-यासह नऊ जिल्ह्यांवर विशेष लक्ष

Siddharth Latkar

सातारा : विषाणूचा काेणताही नवा प्रकार उदयास आला नाही आणि संक्रमित भागात नागरिकांनी कोविड 19 च्या मार्गदर्शक तत्वांचे covid 19 guideliness काटेकाेरपण पालन केल्यास तसेच त्या भागातील नागरिकांचे जास्ती जास्त लसीकरण vaccination झाल्यास पुढील दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील काेविड 19 रुग्णांची संख्या कमी होईल असा विश्वास राज्याचे आराेग्य विभागाने आणि राज्य कृती दलाने व्यक्त केला आहे. (state-task-force-expects-further-drop-in-maharashtra-covid-cases-in-next-fortnight)

राज्याच्या कृती दलाचे सदस्य डाॅ. शशांक जाेशी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बाेलताना काेराेनाच्या दुस-या लाटेतील संक्रमण कमी हाेण्यासाठी नागरिकांनी काेराेना हाेऊ नये यासाठी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे याबराेबरच हात स्वच्छ धुणे याची काटेकाेर अंमलबजावणी केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ज्या भागात माेठ्या प्रमाणात संक्रमण झाले आहे तेथे विषाणुचा नवा प्रकार उदभवू नये यासाठी आवश्यक उपाययाेजना आखणे आखल्या जात आहेत असे स्पष्ट केले.

जाेशी म्हणाले, महाराष्ट्र maharashtra आणि केरळ kerala येथे अजूनही दररोज नऊ ते दहा हजार नागरिक संक्रमित हाेत आहेत तर देशात चाळीस हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद आहे. "ही रुग्ण संख्या कमी हाेईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी (तज्ञ) डॉ. प्रदीप आवटे यांनी देखील महाराष्ट्रातील काेविड 19 बाधितांची संख्या घटेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले देशातील संक्रमित संख्या पाहता (ट्रेंडप्रमाणे) येत्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील काेविड 19 बाधितांची संख्या घटली पाहिजे. एकूणच सर्वत्र संख्या घटत असल्याने महाराष्ट्रात जुलैच्या अखेरीस संख्या घटेल. राज्यातील १० जिल्ह्यांत जिथे संक्रमण अजूनही जास्त आहे तेथील संख्या देखील कमी येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

“राज्यात डेल्टा-प्लसची रुग्ण फारसे नाहीत. परंतु यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे, "असेही डॉ. आवटे यांनी नमूद केले. साथीच्या आजाराच्या तिस-या लाटेबाबत आत्ता बाेलणे फार घाईची हाेईल. या लाटेची तीव्रता आणि व्यापकत्व आत्ताच बाेलणे उचित ठरणार नाही. परंतु आपण हतबल हाेऊ चालणार नाही असा सल्लाही डाॅ. आवटे यांनी दिला.

महाराष्ट्रात सध्या १.२ लाखांहून अधिक सक्रिय काेविड 19 चे रूग्ण आहेत. यामधील 34 टक्के रग्ण रूग्णालयात आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची स्थिती 13 टक्के आहे. राज्यातील एकूणच रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण 96 टक्के आहे. राज्यात तीन जुलैपर्यंत राज्याचा साप्ताहिक पाॅझिटिव्हीटीचा दर 4.5 टक्के होता. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा, पुणे (ग्रामीण), पालघर आणि रायगड येथे चाचणी नंतरचा पाॅझिटिव्हीटीचा दर हा 4.5 टक्क्यांहून अधिक असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

कोल्हापुरचा 3 जुलैपर्यंत पाॅझिटिव्हीटीचा दर हा 10 टक्के हाेता. ताे राज्यात सर्वाधिक ठरला आहे. त्यानंतर सातारा (9.1%) आहे. राज्यात सर्वात कमी गोंदिया (0.29 %), नांदेड (0.36%) आणि जळगाव (0.4%) मध्ये नोंदविण्यात आली.

डॉ जोशी म्हणाले कृती दलाच्या माध्यमातून आम्ही नऊ जिल्ह्यांतील अधिका-यांना संक्रमण कमी हाेण्यासाठी सूचना केल्या आहेत. यामध्ये चाचण्या वाढविणे (covid19 tests) , रुग्णांच्या संपर्कातील लाेकांना शाेधून काढणे (contact tracing) करणे आणि लसीकरणाची (corona vaccination) गती वाढविणे तसेच योग्य उपाययोजना सुनिश्चित करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

पाच टक्क्यांपेक्षा कमी पाॅझिटिव्हिटीचा दर ठेवण्याचे ध्येय अथवा लक्ष्य असणे आवश्यक आहे. गेल्या दोन आठवड्यांत काही जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्ण संख्येत घट होत असली तरी, पहिल्या लाटेप्रमाणे, राज्यातील सर्व जिल्हा समान कक्षात आला पाहिजे, ”असे सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. आर जोतकर यांनी नमूद केले.

“एकूणच राज्याची सरासरी ही एक सकारात्मक चिन्हे असू शकते, परंतु कोल्हापूर आणि सातारा यासारख्या जिल्ह्यांत जास्त पाॅझिटिव्हिटीचा दर असल्याने या भागात बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याची गरज निर्माण झाली आहे. (व्हायरस) उत्परिवर्तनांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे, परंतु लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करणे हाच पुढे जाण्याचा एक मार्ग आहे. कोविड 19 प्रादुर्भाव काळात निमयांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जावी.

ज्या जिल्ह्यांमध्ये पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण जास्त आहे अशा जिल्ह्यांनी चाचण्या वाढवाव्यात, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शाेधणे, हॉटस्पॉट्स ओळखणे आणि लसीकरणाची गती वाढविली पाहिजे आणि काेणत्याही प्रकाराची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत नाही ना याची काळजी घ्यावी अशा सूचना राज्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'; मुंबई स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT