मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेलंय आहे. त्यामुळे नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’चा त्रास जाणवत आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. बुधवारी मान्सूनची परतीची वाटचाल सुरू होती. मान्सूनच्या पुढील परतीसाठी सध्या हवामान पोषक आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. तसंच मध्य महाराष्ट्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अमरावतीमध्ये राज्यातील सर्वाधिक ३९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. वर्ध्यामध्ये ३८ अंश तापमानाची नोंद झाली. तर अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि चंद्रपूरमध्ये ३७ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलंय. दुसरीकडे जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलंय.
राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात आकाश काही प्रमाणात ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बुधवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध शहरांमध्ये नोंदलेले तापमान-
पुणे : कमाल ३५.७° / किमान २१.५°
अहिल्यानगर : कमाल ३६.४° / किमान २४.७°
धुळे : कमाल ३७° / किमान १७.६°
जळगाव : कमाल ३७.५° / किमान १७.२°
जेऊर : कमाल ३५.५° / किमान तापमान उपलब्ध नाही
कोल्हापूर : कमाल ३३.६° / किमान २३.१°
महाबळेश्वर : कमाल २७.५° / किमान १८.५°
मालेगाव : कमाल ३६.८° / किमान २५°
नाशिक : कमाल ३४.८° / किमान २०.६°
निफाड : कमाल ३५.९° / किमान १९.४°
सांगली : कमाल ३४.३° / किमान २१.९°
सातारा : कमाल ३६° / किमान १९.५°
सोलापूर : कमाल ३७.३° / किमान २२.२°
सांताक्रूझ : कमाल ३३.५° / किमान २६°
डहाणू : कमाल ३३.२° / किमान २४.४°
रत्नागिरी : कमाल ३३.८° / किमान २४.६°
छत्रपती संभाजीनगर : कमाल ३७.४° / किमान २१.२°
धाराशिव : कमाल ३३.८° / किमान २२.२°
परभणी : कमाल ३५.४° / किमान १९.९°
परभणी (कृषी) : कमाल ३५.२° / किमान १७.९°
अकोला : कमाल ३७.९° / किमान २३°
अमरावती : कमाल ३९.६° / किमान २१.७°
ब्रह्मपुरी : कमाल ३५.४° / किमान २३.८°
बुलडाणा : कमाल ३६° / किमान २२.२°
चंद्रपूर : कमाल ३७° / किमान २४.२°
गडचिरोली : कमाल ३४.६° / किमान २२.२°
गोंदिया : कमाल ३३.८° / किमान १९.८°
नागपूर : कमाल ३३.८° / किमान १९.८°
वर्धा : कमाल ३८° / किमान २२.५°
वाशीम : कमाल ३६° / किमान १९°
यवतमाळ : कमाल ३५.६° / किमान १९°
उत्तर महाराष्ट्र : किमान १७° / कमाल ३७.५°
पश्चिम महाराष्ट्र : किमान १८.५° / कमाल ३७.३°
कोकण : किमान २४.४° / कमाल ३३.८°
मराठवाडा : किमान १७.९° / कमाल ३७.४°
विदर्भ : किमान १९° / कमाल ३९.६°
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.