Beed : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारे आठवडी बाजार सुरू करा! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारे आठवडी बाजार सुरू करा!

लाखोंचे दसरा मेळावे, राजकीय सभा-संमेलने, मंदिर देवस्थाने उघडली, आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आठवडी बाजार सुरू करा. या मागणीसाठी बीडच्या नेकनूर येथे अनोखे आंदोलन करण्यात आले.

विनोद जिरे

बीड : लाखोंचे दसरा मेळावे, राजकीय सभा-संमेलने, मंदिर देवस्थाने उघडली, आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आठवडी बाजार सुरू करा. या मागणीसाठी बीडच्या नेकनूर येथे अनोखे आंदोलन करण्यात आले, तसेच परवानगी दिली नाही तर असहकार आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. आठवडी बाजार बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. तसेच लहान मोठ्या व्यापार्‍यावर उपासमारीची वेळ आली असून कर्ज आणि गुंतवलेले भांडवल बाहेर निघत नसल्यामुळे, आत्महत्या करण्याची वेळ आलीय. मोठमोठे मॉल होस्टेल आणि मेट्रो सिटी मधील बाजारपेठा सुरू झाल्या मग ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बीडच्या नेकनूरच्या आठवडी बाजारात, सुईपासून सोन्यापर्यंत सर्व वस्तू पालावर मिळतात. रविवारी भरणाऱ्या या बाजाराची एक दिवसांमध्ये जवळपास पाच कोटी पर्यंत उलाढाल होते. जनावर खरेदी आणि विक्री करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व्यापारी आणि लोक येत असतात. यामुळे परिसरातील 25 गावातील लहान मोठ्या व्यावसायिकांना या बाजारात रोजगार मिळतो. तसेच त्यांचा उदरनिर्वाह भागतो.

हे देखील पहा :

मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून बाजारपेठा बंद असल्यामुळे, लहान मोठे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. आर्थिक परिस्थिती बिघडत चालल्याने आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं सांगत आहेत. व्यापारी गावांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महानगरातील मॉल आणि मार्केट सुरू झाले मग ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद का ? असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत

नेकनूरच्या बाजारामध्ये भाजीपाल्याची विक्री करणारे किशोर चव्हाण आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्याचे दुकान लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. पंधरा ते वीस गाव खेड्यातील लोक बाजारात येत असल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची विक्री होत असते. एक दिवसाच्या बाजारावर आठ दिवसाचा खर्च भागत असतो. मात्र, दीड वर्षापासून बाजार बंद असल्यामुळे, गाडी देखील उभी आहे. त्याचे हप्ते आणि पैसे भरायचे कुठून ? असा प्रश्न किशोर चव्हाण यांच्या समोर आहे.

नेकनूर येथील चिवड्याचे दुकानदार बाळू भुजंगे यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या दीड वर्षापासून बाजार बंद असल्यामुळे बाजारामध्ये दुकान लावता येत नाही. तसेच बाहेर कुठे रस्त्यावर विक्री करता येत नाही. यामुळे कुटुंब चालवाव कसं ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे

नेकनूरचा बाजारामध्ये सोने देखील पालावर विकली जातात. सोने विक्री करणारे सुजित अमरापुरकर यांना देखील बाजार बंद असल्यामुळे मोठा फटका बसला आहे. पंधरा ते वीस गावातील ग्रामीण भागातील लोक बाजारात येत असतात आणि त्यातून सोने विक्री मधून व्यवसाय चालतो. मात्र बाजार बंद असल्यामुळे व्यवसाय बंद आहे. त्यामुळे लवकरात लवकर बाजार सुरू करावेत. अशी मागणी सुजित अमरापूरकर यांनी केले.

दरम्यान, महानगरातील मॉल आणि मार्केट सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील आठवडी बाजार सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतमालाला भाव तसेच लघु व्यापाऱ्यांचे उपासमार थांबवण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत ठेवण्यासाठी, कोरोणाचे नियम घालून बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा असहकार आंदोलन करून सरकारचे नियम पाळणार नाही. असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

SCROLL FOR NEXT