MLA Disqualification Case Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा. इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा. तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ यांचा फोटो वापरु नका याच्या सूचना द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आहेत. त्याशिवाय आम्ही दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. सगळ्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर लिहा, असेही कोर्टाने अजित पवार गटाला सांगितले.
महत्त्वाचं म्हणजे, कोर्टाकडून अजित पवार आणि शरद पवार गटाला निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना केल्या आहेत. शरद पवार यांचे फोटो अजित पवार गटाकडून वापरले जात असल्याची तक्रार शरद पवार गटाने कोर्टात केली होती. आज त्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी बोलताना कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो... दरवेळी मतदारांना प्रभावित करेल असं नाही. आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही, असेही कोर्टाने निरीक्षण नोंदवलं.
कोर्टाने दिलेले आदेश आम्ही पाळले - अजित पवार वकील
कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही सर्व वृत्तपत्रात जाहिरात दिल्या - अजित पवार वकील
अजित पवार यांच्या वकिलांकडून ज्याा मराठी वर्तमान पत्रात जाहिराती दिल्या त्या वर्तमान पात्रांची नाव कोर्टात सांगितली.
एकूण ११ वर्तमान पत्रात आम्ही जाहिराती दिल्या आहेत - अजित पवार वकील
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत जाहिराती दिल्या - अजित पवार वकील
ट्रम्प यांच्या खाली वर्तमानपत्रात जाहिरात दिसतेय, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची मिश्किल टिप्पणी
बारामती आणि राज्यात इतर ठिकाणी आमच्या प्रचाराच्या असलेल्या गाड्यांवर देखील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशी माहिती लिहिलेली आहे - अजित पवार वकील
वकिलांनी कोर्टात ज्या गाड्यांवर असे स्टिकर लावले आहेत त्यांचे नंबर सांगितले.
अजित पवार यांच्या वकिलांनी प्रचारात फिरवल्या जाणाऱ्या रिक्षांचे फोटो कोर्टाला दाखवले.
कोर्टाच्या सूचनेनंतर कुठलाही संभ्रम राहिला नाही - अजित पवार वकील
आता कोणताही संभ्रम उरलेला नाही - अजित पवार वकील
हे कशाच्या आधारावर इथे अर्ज घेऊन आले - अजित पवार
आम्ही न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्याचा मजकूर सर्वत्र प्रसिद्ध केला आहे, आज आम्ही पुरावे सादर केले आहेत - अजित पवार
मतदारांवर आमचा परिणाम होईल इतकं मतदारांना कमी समजू नका - न्यायालयाचे निरीक्षण
हे स्वतःची स्वतःला विरोधाभासी भूमिका मांडत आहे- शरद पवार वकील
यांना शरद पवारांचे गुडविल वापरायचं आहे - अभिषेक सिंघवी (शरद पवार गट)
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे काल, त्यात शरद पवारांचा उल्लेख आहे - सिंघवी
ग्रामीण भागातील मतदार ट्विटर वगैरे खरंच पाहतात का ? - न्यायमूर्ती
ग्रामीण भागात दिल्लीतील घडामोडींचाही परिणाम होतो - सिंघवी
शरद पवार स्वतः अजित पवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत ना? - न्यायालयाचे निरीक्षण
पण शरद पवारांचा फोटो का वापरतात ? - अभिषेक सिंघवी
अमोल मिटकरी स्वतः आमदार आहे ते त्यांचे अधिकृत ट्विटर हँडल आहे - सिंघवी
महाराष्ट्रातील लोकांना दोघांमधील भांडण माहिती नसतील असं तुम्हाला वाटतं का? सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांच्या वकिलांना सवाल
तुम्ही जर प्रत्यक्ष एकमेकांच्या विरोधात कितीतरी जागा लढताहेत तर मग लोकांना हे स्पष्ट माहिती आहे - न्यायालयाचे निरीक्षण
आधीच आदेश पारीत करण्यात आला आहे - न्यायालय
अजित पवार यांच्या वकिलांनी कोर्टात रिक्षाचे दाखवलेले फोटो, फक्त सुनावणीसाठी तयार करण्यात आले आहेत,
शरद पवार यांच्या पक्षाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा गंभीर आरोप
सिंघवी यांनी कोर्टात ते फोटो कसे खोटे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला
घड्याळ चिन्ह गोठवल पाहिजे... घड्याळ ऐवजी दुसरं हवं ते चिन्ह अजित पवार यांना देण्यात यावं, शरद पवार यांच्या वकिलांची आज कोर्टात पुन्हा एकदा मागणी
न्या. सूर्यकांत- जरी तो व्हिडीओ जुना असेल किंवा काहीही असले तरी तुम्ही शरद पवारांचा चेहरा का वापरता? कोर्टाचा अजित पवार यांच्या वकिलांना सवाल
तुमच्या सगळ्या उमेदवारांनी शरद पवारांचे फोटो , व्हिडीओ कशाला वापरले पाहिजे- सर्वोच्च न्यायालय
जर तुमचे वैचारिक मतभेद आहेत तर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिल पाहिजे ना- न्यायालयाचे निरीक्षण
आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांचे फोटो व्हिडीओ वापरत नाहीये, अजित पवार गटाची कोर्टात स्पष्टोक्ती
तुम्ही दोघांनी आपापल्या युद्धभूमीवर (निवडणुकीवर) लक्ष केंद्रीत करा
व्हिडीओ वगैरेचा कधी कधी प्रभाव पडतो... दरवेळी मतदारांना प्रभावित करेल अस नाही
आपल्या देशातील जनता खूप हुशार आहे, त्यांना कोणी फसवू शकत नाही - कोर्ट
तुम्ही एक इलेक्ट्रॉनिक परिपत्रक काढा, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांना निर्देश
तुमचे उमेदवार, कार्यकर्त्यांना शरद पवारांचे फोटो, व्हिडीओ यांचा फोटो वापरु नका याच्या सूचना द्या
स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा, कोर्टाच्या अजित पवार यांना सूचना
पुढील मंगळवारी पुढची सुनावणी होणार
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.