ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेध
ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेध Saam TV
महाराष्ट्र

ST Strike: अनिल परबांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला निषेध

विश्वभूषण लिमये

सोलापूर : परिवहन मंत्री अनिल परब हे आज एकदिवसीय सोलापूर दौऱ्यावर आले होते, मात्र, त्यांनी सोलापुरातील एस टी कामगारांची भेट घेणं टाळलं, उलट आता कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या याच भूमिकेचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील संपवार बसलेल्या ST कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या प्रतिमेला रक्ताचा टिळा लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

जोपर्यंत विलीनिकरण होत नाही तोपर्यंत ST कर्मचारी (ST Employee) आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका ही यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनकडून घेण्यात आली. दरम्यान आज दिवसभरात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २२८ असून आता एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १७४१ एकूण निलंबित कर्मचारी संख्या ११०२४ झाली आहे तसंच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३६७९ वर गेली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT