ST Strike: ST कामगारांवर केलेली कारवाई आता माघारी घेणार नाही - परिवहन मंत्री

'ST कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी त्यांना चार वेळा संधी देण्यात आलेली होती शिवाय याबाबत त्यांना वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते'
ST Strike: ST कामगारांवर केलेली कारवाई आता माघारी घेणार नाही - परिवहन मंत्री
ST Strike: ST कामगारांवर केलेली कारवाई आता माघारी घेणार नाही - परिवहन मंत्री Saam TV

सोलापूर : ST कामगारांवर कारवाई होणार नाही यासाठी त्यांना चार वेळा संधी देण्यात आलेली होती शिवाय याबाबत त्यांना वेळोवेळी आवाहन करूनही एसटी कामगार कामावर परतले नव्हते, त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार आहे असं मत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सोलापुरात व्यक्त केल आहे.

एसटी आंदोलन चुकीच्या दिशेने -

दरम्यान, ज्या एसटी कामगारांवर (ST Employee) आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेण्यात येणार नाही, दिवाळीच्या अगोदर आत्तापर्यंत सरकारनं 50 एसटी कर्मचाऱ्यांच्या गटांना भेटी दिल्या आहेत, 28 युनियनच्या कृती समितीबरोबर करार ही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या, तरीसुद्धा ते आंदोलन मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन (ST workers' agitation) चुकीच्या दिशेने भरकटत चाललं आहे.

ST Strike: ST कामगारांवर केलेली कारवाई आता माघारी घेणार नाही - परिवहन मंत्री
Raigad: रायगड नंतर कुलाबा किल्यावरील अनधिकृत मदार हटविण्याची मागणी

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत. त्यांच्या जर जीवाला धोका असेल त्यांनी रीतसर पोलीस संरक्षण मागावं शासन ते देईल, कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये असं ही अनिल परब (Solapur) म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com